S M L

विधानसभा उपाध्यक्षपदासाठी प्रा. वसंत पुरके यांची निवड होण्याची शक्यता

04 डिसेंबरविधानसभा उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे प्रा. वसंत पुरके यांचे तर युतीकडून सूर्यकांत दळवी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. 7 डिसेंबरला मंगळवारी ही निवडणूक होणार आहे. पण फॉर्म मागे घेण्याची मुदत आज तीन वाजेपर्यंत आहे. युतीचे दळवी अर्ज मागे घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पुरके यांची निवड निश्चित मानली जात आहे. वसंत पुरके यांचे नाव मंत्रिमंडळाच्या यादीत होतं मात्र ऐन वेळी त्यांचा पत्ता कट झाला. आता उपाध्यक्षपद देऊन त्यांचे समाधान करण्यात येईल अशी शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष पदकतालिका यादीतून जितेंद्र आव्हाडांचे नाव वगळा अशी मागणी शिवसेनेने केली. शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाईंनी ही मागणी केली आहे. आव्हाडांचा आदर्श मध्ये फ्लॅट असल्याचा त्यांनी हा आरोप केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2010 09:35 AM IST

विधानसभा उपाध्यक्षपदासाठी प्रा. वसंत पुरके यांची निवड होण्याची शक्यता

04 डिसेंबर

विधानसभा उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे प्रा. वसंत पुरके यांचे तर युतीकडून सूर्यकांत दळवी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. 7 डिसेंबरला मंगळवारी ही निवडणूक होणार आहे. पण फॉर्म मागे घेण्याची मुदत आज तीन वाजेपर्यंत आहे. युतीचे दळवी अर्ज मागे घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पुरके यांची निवड निश्चित मानली जात आहे. वसंत पुरके यांचे नाव मंत्रिमंडळाच्या यादीत होतं मात्र ऐन वेळी त्यांचा पत्ता कट झाला. आता उपाध्यक्षपद देऊन त्यांचे समाधान करण्यात येईल अशी शक्यता आहे.

विधानसभा अध्यक्ष पदकतालिका यादीतून जितेंद्र आव्हाडांचे नाव वगळा अशी मागणी शिवसेनेने केली. शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाईंनी ही मागणी केली आहे. आव्हाडांचा आदर्श मध्ये फ्लॅट असल्याचा त्यांनी हा आरोप केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2010 09:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close