S M L

विधानसभा उपाध्यक्षपदी वसंत पुरके यांची बिनविरोध निवड

04 डिसेंबरविधानसभा उपाध्यक्षपदी काँग्रेसचे वसंत पुरके यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेनेच्या सूर्यकांत दळवी यांनी आपला अर्ज माघारी घेतल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली. प्रत्यक्ष निवडणूक ही सात डिसेंबरला म्हणजे मंगळवारी होणार होती. आज अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंतच होती. त्यावेळी शिवसेनेच्या सूर्यकांत दळवी यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने त्या पदावर वसंत पुरके यांची बिनविरोध वर्णी लागली. मंत्रिमंडळात वर्णी न लागल्यानं आदीवासी समाजातले वसंत पुरके नाराज होते. आता हायकमांडच्या सांगण्यावरुनच त्यांना या पदावर बसवण्यात आल्याचे समजते. विधानसभा उपाध्यक्षपद हे राज्यमंत्रीपदाच्या बरोबरीचे आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2010 04:11 PM IST

विधानसभा उपाध्यक्षपदी वसंत पुरके यांची बिनविरोध निवड

04 डिसेंबर

विधानसभा उपाध्यक्षपदी काँग्रेसचे वसंत पुरके यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेनेच्या सूर्यकांत दळवी यांनी आपला अर्ज माघारी घेतल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली. प्रत्यक्ष निवडणूक ही सात डिसेंबरला म्हणजे मंगळवारी होणार होती. आज अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंतच होती. त्यावेळी शिवसेनेच्या सूर्यकांत दळवी यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने त्या पदावर वसंत पुरके यांची बिनविरोध वर्णी लागली. मंत्रिमंडळात वर्णी न लागल्यानं आदीवासी समाजातले वसंत पुरके नाराज होते. आता हायकमांडच्या सांगण्यावरुनच त्यांना या पदावर बसवण्यात आल्याचे समजते. विधानसभा उपाध्यक्षपद हे राज्यमंत्रीपदाच्या बरोबरीचे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2010 04:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close