S M L

द्राक्ष बागायतदाराची आत्महत्या

भगवान पाटील, मालेगाव 05 डिसेंबरमुलीच्या लग्नाची वरात निघण्याऐवजी वडिलांची प्रेतयात्रा काढावी लागली. ही दुर्देवी परिस्थिती ओढवली मालेगावमधल्या शेलार कुटुंबापुढे. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान सहन न होऊन कुटुंबातल्या विनोद शेलारांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. गेल्या 10 दिवसातली नाशिक जिल्ह्यातली ही चौथी आत्महत्या.शून्यात नजर लावून बसलेल्या सत्तरीतल्या रावजी शेलारांवर दु:खाचा अक्षरशः डोंगर कोसळला. विनोद शेलार यांनी मोठ्या उमेदीने दीड एकरात द्राक्षबाग केली होती. चांगलं उत्पन्न मिळेल अशी आशा होती. पण गेली तीन वर्ष सलग निसर्गाने घात केला. पहिल्या वर्षी गारपिटीने दुसर्‍या वर्षी फयानने तर यंदा अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला. पीक तर गेलंच पण आता कर्ता मुलगा गमावल्याचं दुःख ते शब्दातही मांडू शकत नाहीत अशी अवस्था आहे.त्यांच्यावर सोसायटीचे अडीच लाखांचे कर्ज आहे. शिवाय पाहुण्यारावळ्यांची उसनावरी वेगळीच आहे. निसर्गाने दगा दिल्याने घरखर्च भागवायला त्यांच्यावर मोलमजुरीची वेळ आली होती. त्यातच त्यांच्या मुलीचं लग्न ठरलं होते. द्राक्षाचा येणारा हंगाम तरी चांगला जाईल आणि मुलीचे लग्नही निर्विघ्नपणे पार पडेल या आशेने विनोद मोठ्या उमेदीनं पिकाकडे पाहात होते. पण त्यांची ही स्वप्नं अवकळी पावसाने अक्षरशः धुळीला मिळवली. याच निराशेतून विनोद शेलार यांनी आत्महत्या केली. गेल्या 10 दिवसातली नाशिक जिल्ह्यातली ही चौथी आत्महत्या. ज्या द्राक्षाने नाशिकच्या शेतकर्‍याला बागायतदार केलं. त्या द्राक्षबागाच या अवकळी पावसानं त्यांच्या जीवावर उठल्या सरकार मात्र विचार करण्यात मश्गुल आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2010 01:20 PM IST

द्राक्ष बागायतदाराची आत्महत्या

भगवान पाटील, मालेगाव

05 डिसेंबर

मुलीच्या लग्नाची वरात निघण्याऐवजी वडिलांची प्रेतयात्रा काढावी लागली. ही दुर्देवी परिस्थिती ओढवली मालेगावमधल्या शेलार कुटुंबापुढे. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान सहन न होऊन कुटुंबातल्या विनोद शेलारांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. गेल्या 10 दिवसातली नाशिक जिल्ह्यातली ही चौथी आत्महत्या.

शून्यात नजर लावून बसलेल्या सत्तरीतल्या रावजी शेलारांवर दु:खाचा अक्षरशः डोंगर कोसळला. विनोद शेलार यांनी मोठ्या उमेदीने दीड एकरात द्राक्षबाग केली होती. चांगलं उत्पन्न मिळेल अशी आशा होती. पण गेली तीन वर्ष सलग निसर्गाने घात केला. पहिल्या वर्षी गारपिटीने दुसर्‍या वर्षी फयानने तर यंदा अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला. पीक तर गेलंच पण आता कर्ता मुलगा गमावल्याचं दुःख ते शब्दातही मांडू शकत नाहीत अशी अवस्था आहे.

त्यांच्यावर सोसायटीचे अडीच लाखांचे कर्ज आहे. शिवाय पाहुण्यारावळ्यांची उसनावरी वेगळीच आहे. निसर्गाने दगा दिल्याने घरखर्च भागवायला त्यांच्यावर मोलमजुरीची वेळ आली होती. त्यातच त्यांच्या मुलीचं लग्न ठरलं होते. द्राक्षाचा येणारा हंगाम तरी चांगला जाईल आणि मुलीचे लग्नही निर्विघ्नपणे पार पडेल या आशेने विनोद मोठ्या उमेदीनं पिकाकडे पाहात होते. पण त्यांची ही स्वप्नं अवकळी पावसाने अक्षरशः धुळीला मिळवली.

याच निराशेतून विनोद शेलार यांनी आत्महत्या केली. गेल्या 10 दिवसातली नाशिक जिल्ह्यातली ही चौथी आत्महत्या. ज्या द्राक्षाने नाशिकच्या शेतकर्‍याला बागायतदार केलं. त्या द्राक्षबागाच या अवकळी पावसानं त्यांच्या जीवावर उठल्या सरकार मात्र विचार करण्यात मश्गुल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2010 01:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close