S M L

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतराष्ट्रीय स्मारक अजुन प्रतिक्षेत

गोविंद तुपे, मुंबई05 डिसेंबरगेल्या कित्येक वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतराष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न मात्र तसाच आहे. या प्रश्नावर कित्येकांनी निवडणुका लढवल्या, सत्ता उपभोगल्या, पण स्मारकाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. पाच महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री डॉ. नसीम खान यांनी हे आश्वासन दिले होते. ते आश्वासन हवेतच विरलेले दिसत आहे डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बनवायला दोन महिन्यांच्या आत सुरूवात होईल असं राज्य सरकारने सांगितले होते. पण अजूनही स्मारक झालेले नाही. दादर इथल्या इंदू मिलची चार एक्कर जागा डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देण्यास सरकारने तत्वत; मान्यता दिली असं नॅशनल टेक्स्टाईल कार्पोरेशन लिहलेल्या एका पत्रात कळवल पण असे जरी असले तरी राज्यातले नगरविकास खाते मात्र हा प्रस्ताव विचाराधिन असल्याचे माहितीच्या अधिकारात सागंत आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून रखडलेला हा स्मारकाचा प्रश्न आजून किती दिवस रखडणार असा सवाल आंबेडकरी अनुयायी करू लागले. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उर्वरीत इंदू मिलची जागा कोणत्यातरी व्यवसायिकाच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे. पण संपूर्ण इंदू मिलची 12 एकर जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी द्यावी. त्याचा मोबदला आम्ही देऊ असे सामाजिक समता मंचाचे अध्यक्ष विजय कांबळे यांचे म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2010 01:53 PM IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतराष्ट्रीय स्मारक अजुन प्रतिक्षेत

गोविंद तुपे, मुंबई

05 डिसेंबर

गेल्या कित्येक वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतराष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न मात्र तसाच आहे. या प्रश्नावर कित्येकांनी निवडणुका लढवल्या, सत्ता उपभोगल्या, पण स्मारकाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.

पाच महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री डॉ. नसीम खान यांनी हे आश्वासन दिले होते. ते आश्वासन हवेतच विरलेले दिसत आहे डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बनवायला दोन महिन्यांच्या आत सुरूवात होईल असं राज्य सरकारने सांगितले होते. पण अजूनही स्मारक झालेले नाही.

दादर इथल्या इंदू मिलची चार एक्कर जागा डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देण्यास सरकारने तत्वत; मान्यता दिली असं नॅशनल टेक्स्टाईल कार्पोरेशन लिहलेल्या एका पत्रात कळवल पण असे जरी असले तरी राज्यातले नगरविकास खाते मात्र हा प्रस्ताव विचाराधिन असल्याचे माहितीच्या अधिकारात सागंत आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून रखडलेला हा स्मारकाचा प्रश्न आजून किती दिवस रखडणार असा सवाल आंबेडकरी अनुयायी करू लागले.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उर्वरीत इंदू मिलची जागा कोणत्यातरी व्यवसायिकाच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे. पण संपूर्ण इंदू मिलची 12 एकर जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी द्यावी. त्याचा मोबदला आम्ही देऊ असे सामाजिक समता मंचाचे अध्यक्ष विजय कांबळे यांचे म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2010 01:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close