S M L

आयसीसीची भारतीय खेळाडूंबरोबर दुजाभावाची भूमिका

31 ऑक्टोबर- दिल्ली, भारताच्या गौतम गंभीरवर मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांच्याकडून एका टेस्ट मॅचची बंदी ठोठवण्यात आली आहे. कोटलावर सुरु असलेल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी गंभीर आणि वॉट्सन यांच्यात चकमक झाली होती. मैदानातील धक्काबुक्की खपवून घेतली जाणार नाही असं ख्रिस ब्रॉड यांनी निर्णय दिल्यानंतर म्हटलंय. दुस•या रन्ससाठी धावणा•या गंभीरला वॉटसननं जाणूनबुजून अडवण्याचा प्रयत्न केला. आणि याला गंभीरनं चांगलंच उत्तर दिलं. दोघांमध्ये थोडीफार शाब्दिक चकमकही झाली. चूक कोणाची होती हे सा-या जगानं पाहिलं. पण हे प्रकरण मैदानावरच संपेल असंच सर्वांना वाटलं होतं. दोन्ही खेळाडंूनीही एकमेकांविरुध्द तक्रारही केली नाही. पण मैदानावरच्या अंपारयनं मात्र या प्रकाराची थेट मॅच रेफ्रीकडे तक्रार केली. आणि मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. बीसीसीायनं या एकतर्फी निर्णयावर अपील करण्याचं ठरवलंय.या अपीलावर निर्णय काहीही लागो, पण एक मात्र नक्की झालंय, आयसीसीची भारतीय खेळाडूंबरोबरची दुजाभावाची भूमिका पुन्हा एकदा समोर आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 31, 2008 05:55 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2008 05:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close