S M L

कृत्रिम किडनीचं वरदान

06 डिसेंबरअमेरिकेतल्या भारतीय संशोधकानं कृत्रिम किडनी तयार केली आहे. जगातली अशा प्रकारची ही पहिलीच किडनी आहे. जर मानवी शरीरात ही किडनी यशस्वीपणे बसवण्यात यश आलं, तर कित्येक पेशंट्सना जीवदान मिळणार आहे. जगातली पहिली कृत्रिम किडनी तयार झाली. ही किडनी नैसर्गिक किडनीसारखंच शरीरातले सगळे कार्य करते. आणि आपल्या या संशोधनासाठी चर्चेत आहेत भारतीय मूळ असलेले शास्त्रज्ञ शुवो रॉय. अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया विद्यापीठात शुवो रॉय आणि त्यांच्या टीमनं ही किडनी तयार केली. ज्यामुळे डायलिसिस आणि किडनी प्रत्यारोपणला पर्याय सापडणार आहे.- ही किडनी दोन भागात बनवण्यात आली. - पहिला भाग सिलिकॉन चिप्सनं बनवण्यात आला, जी रक्तप्रवाहातले टॉक्सिन्स फिल्टर करू शकतात.- फिल्टर केलेले पदार्थ किडनीच्या दुसर्‍या भागात शोषून घेतले जातात - हा दुसरा भागसुद्धा सिलिकॉन चिप्सनंच बनवण्यात आला. पण त्याला मानवी किडनी सेल्सचं आवरण आहे - या किडनी सेल्स पाणी, साखर, आणि मीठ यासारखे काही महत्त्वाचे पदार्थ पुन्हा शोषून घेण्याचे महत्त्वाचे कार्य करतात- त्या व्हिटॅमिन डी सुद्धा तयार करतात आणि ब्लड प्रेशर नियमित करण्याचं कार्य करतात- खर्‍या किडनीसारखं हे सर्व कार्य होतंरॉय यांच्या टीमने सध्या उंदीर आणि डुकरांमध्ये या कृत्रिम किडनीचे प्रत्यार्पण केले. प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांचे परिणाम आतापर्यंत चांगले दिसून आले आहेत. पुढच्या पाच वर्षांत मानवी शरीरात या किडनी प्रत्यार्पणाचे प्रयोग होणार आहेत. भारतात किडनीशी संबंधित असणारे दरवर्षी दीड लाख नवे पेशंट्स तयार होतात आणि डायलिसिस पेशंट्सची संख्यासुद्धा तितकीच मोठी आहे. या सर्वांना रॉय यांचे संशोधन नवजीवन देणारे ठरेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 6, 2010 04:42 PM IST

कृत्रिम किडनीचं वरदान

06 डिसेंबर

अमेरिकेतल्या भारतीय संशोधकानं कृत्रिम किडनी तयार केली आहे. जगातली अशा प्रकारची ही पहिलीच किडनी आहे. जर मानवी शरीरात ही किडनी यशस्वीपणे बसवण्यात यश आलं, तर कित्येक पेशंट्सना जीवदान मिळणार आहे.

जगातली पहिली कृत्रिम किडनी तयार झाली. ही किडनी नैसर्गिक किडनीसारखंच शरीरातले सगळे कार्य करते. आणि आपल्या या संशोधनासाठी चर्चेत आहेत भारतीय मूळ असलेले शास्त्रज्ञ शुवो रॉय. अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया विद्यापीठात शुवो रॉय आणि त्यांच्या टीमनं ही किडनी तयार केली. ज्यामुळे डायलिसिस आणि किडनी प्रत्यारोपणला पर्याय सापडणार आहे.

- ही किडनी दोन भागात बनवण्यात आली. - पहिला भाग सिलिकॉन चिप्सनं बनवण्यात आला, जी रक्तप्रवाहातले टॉक्सिन्स फिल्टर करू शकतात.- फिल्टर केलेले पदार्थ किडनीच्या दुसर्‍या भागात शोषून घेतले जातात - हा दुसरा भागसुद्धा सिलिकॉन चिप्सनंच बनवण्यात आला. पण त्याला मानवी किडनी सेल्सचं आवरण आहे - या किडनी सेल्स पाणी, साखर, आणि मीठ यासारखे काही महत्त्वाचे पदार्थ पुन्हा शोषून घेण्याचे महत्त्वाचे कार्य करतात- त्या व्हिटॅमिन डी सुद्धा तयार करतात आणि ब्लड प्रेशर नियमित करण्याचं कार्य करतात- खर्‍या किडनीसारखं हे सर्व कार्य होतं

रॉय यांच्या टीमने सध्या उंदीर आणि डुकरांमध्ये या कृत्रिम किडनीचे प्रत्यार्पण केले. प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांचे परिणाम आतापर्यंत चांगले दिसून आले आहेत. पुढच्या पाच वर्षांत मानवी शरीरात या किडनी प्रत्यार्पणाचे प्रयोग होणार आहेत. भारतात किडनीशी संबंधित असणारे दरवर्षी दीड लाख नवे पेशंट्स तयार होतात आणि डायलिसिस पेशंट्सची संख्यासुद्धा तितकीच मोठी आहे. या सर्वांना रॉय यांचे संशोधन नवजीवन देणारे ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2010 04:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close