S M L

आदर्शपाठोपाठ नवी मुंबईत अधिकार्‍यांचं वनश्री गेट

विनय म्हात्रे,नवी मुंबई07 डिसेंबरआदर्श सोसायटीतल्या घोटाळ्याचे प्रकरण ताज असतानाच आता नवी मुंबईत अधिकार्‍यांनी स्वस्तात बळकावलेल्या जागेचे प्रकरण पुढे येत आहे. सिडकोने आदर्श सोसायटीच्या घोटाळ्यात सहभागी असलेल्या काही अधिकार्‍यांसह इतरांना नाममात्र दरात दोन एकर जागा साठ वर्षांच्या लीझवर सिडकोने दिली. नवी मुंबईतला सर्वात प्रसिद्ध असलेला पामबीच रोड. याच रोडलगत असलेली वादग्रस्त ठरलेली वनश्री हाऊसिंग सोसायटी. एनआरआय कॉम्पलेक्स शेजारी आणि खाडीकिनारी उभ्या असलेल्या या टोलेजंग इमारती. याच इमारतीत काही बड्या अधिकार्‍यांनी त्यांच्या नावावर फ्लॅट घेऊन ठेवले आहे. या सोसायटीची 2 एकर एकूण जागा आहे. त्याची सध्याची बाजारभावाप्रमाणं किंमत आहे तब्बल 108 कोटी रुपये. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या इमारतीत राहणार्‍या आयएएस दर्जाच्या अधिकार्‍यांना बाजाराभावापेक्षा कमी दराने जागा देण्याची कमाल सिडकोने केली. 108 कोटी रुपयांची ही जागा सिडकोने केवळ 2 कोटी 24 लाख रुपयांना आणि तब्बल साठ वर्षांच्या लीझवर या अधिकार्‍यांना दिली. या इमारतीत एकूण 80 आयएएस आणि आयपीएस अधिकारी राहतात. सिडकोच्या एकूण किंमतीनुसार प्रत्येक अधिकार्‍याच्या वाट्याला जागेची किंमत ही केवळ 2 लाख 80 हजार रुपये इतकी आली. कुठल्याही खुल्या जागेवर उत्तम दर्जाचे बांधकाम केले तर त्यासाठी प्रति स्केअर फूट अंदाजे 1500 रुपये खर्च येतो. वनश्री सोसायटीत झालेल्या बांधकामामध्ये प्रत्येक फ्लॅट हा अंदाजे 2500 स्के.फूटाचा आहे. पंधराशे रुपये दराने बांधकाम केल्यास त्याची मूळ किंमत अंदाजे होते 37 लाख 50 हजार रुपये शिवाय मूळ जागेतला हिस्सा 2 लाख 80 हजार रुपये याच्यासह प्रत्यक्ष फ्लॅटची अंदाजित किंमत होते 40 लाख 30 हजार रुपये. पण नवी मुंबई वेगाने विकसित होणारे शहर आहे. त्यातच विमानतळाला मंजुरी मिळाल्याने आता इथले बाजारभावही वाढले. या वनश्री मधल्या याच फ्लॅटची बाजारभावनुसार किंमत किती होते.तर 4 पामबिच रोडचा सध्याचा बाजारभाव आहे 10 हजार रुपये स्के.फूट तर वनश्रीमधला अधिकार्‍यांचा एक फ्लॅट आहे अंदाजे 2500 स्के.फूट सध्याच्या बाजारभावानुसार त्याची किंमत होते अंदाजे 2.50 कोटी रुपये.पण प्रत्यक्षात या बड्या अधिकार्‍यांना हा फ्लॅट त्यांच्या पदरात पडला तो केवळ 40 लाख 30 हजार रुपयांना.नवी मुंबईत भविष्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल याची या अधिकार्‍यांना कल्पना होती का ? सर्वसामान्यांना परवडणारी घरं न देणारी सिडको मात्र, या बड्या अधिकार्‍यांसाठी तब्बल साठ वर्षांच्या लीझवर 2 एकराची जागा वापरायला कशी काय देते, असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. वनश्री सोसायटीत या बड्या अधिकार्‍यांचे फ्लॅट 1) जे. पी. डांगेराज्याचे मुख्य सचिव2) जयराज फाटकबीएमसीचे माजी आयुक्त3) उत्तम खोब्रागडेबेस्टचे माजी महाव्यवस्थापक4) किशोर गजभियेसचिव, आदिवासी विभाग5) जयंत कावळेकेंद्रीय ऊर्जा सचिव 6) गोविंद स्वरुपमाजी आएएस अधिकारी7) शरद उपासनीमाजी मुख्य सचिव 8) एम.एस.गिल9) के.पी.रघुवंशीअतिरिक्त महासंचालक, कायदा आणि सुव्यवस्था10) सुरेश जोशीमाजी मुख्य माहिती आयुक्त11) सत्यपाल सिंगअतिरिक्त महासंचालक, आस्थापना12) भगवान सहायमाजी प्रधान सचिव13) स्वाधीन क्षत्रियआयुक्त, बीएमसी14) जी. एस. गिलमाजी एमडी, सिडको16) मालिनी शंकरसचिव, महसूल17) मोरेश्वर अप्पलवारविलासरावांचे माजी सचिव18) इक्बाल चहलआयुक्त, उत्पादन शुल्क19) ओ.पी. गेहरोत्रामाजी प्रधान सचिव20) सुधीर श्रीवास्तव21) एम. रमेशकुमारमाजी अतिरिक्त मुख्य सचिव22) शैलेशकुमार शर्मातर दूसरीकडे आदर्श सोसायटीमध्ये यातल्याच काही अधिकार्‍यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना फ्लॅट मिळाले. त्याअगोदर वनश्री सोसायटीमध्ये याच अधिकार्‍यांचे फ्लॅट आहेत. अशाप्रकारे दोन -दोन ठिकाणी आपल्या किंवा आपल्या नातेवाईकांच्या नावावर फ्लॅट घेणारे अधिकारी कोण आहेत. 'आदर्श' वनश्रीधारक1) जयराज फाटकमाजी आयुक्त बीएमसी2) उत्तम खोब्रागडेबेस्टचे माजी महाव्यवस्थापक

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 7, 2010 04:48 PM IST

आदर्शपाठोपाठ नवी मुंबईत अधिकार्‍यांचं वनश्री गेट

विनय म्हात्रे,नवी मुंबई

07 डिसेंबर

आदर्श सोसायटीतल्या घोटाळ्याचे प्रकरण ताज असतानाच आता नवी मुंबईत अधिकार्‍यांनी स्वस्तात बळकावलेल्या जागेचे प्रकरण पुढे येत आहे. सिडकोने आदर्श सोसायटीच्या घोटाळ्यात सहभागी असलेल्या काही अधिकार्‍यांसह इतरांना नाममात्र दरात दोन एकर जागा साठ वर्षांच्या लीझवर सिडकोने दिली.

नवी मुंबईतला सर्वात प्रसिद्ध असलेला पामबीच रोड. याच रोडलगत असलेली वादग्रस्त ठरलेली वनश्री हाऊसिंग सोसायटी. एनआरआय कॉम्पलेक्स शेजारी आणि खाडीकिनारी उभ्या असलेल्या या टोलेजंग इमारती. याच इमारतीत काही बड्या अधिकार्‍यांनी त्यांच्या नावावर फ्लॅट घेऊन ठेवले आहे. या सोसायटीची 2 एकर एकूण जागा आहे. त्याची सध्याची बाजारभावाप्रमाणं किंमत आहे तब्बल 108 कोटी रुपये.

पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या इमारतीत राहणार्‍या आयएएस दर्जाच्या अधिकार्‍यांना बाजाराभावापेक्षा कमी दराने जागा देण्याची कमाल सिडकोने केली. 108 कोटी रुपयांची ही जागा सिडकोने केवळ 2 कोटी 24 लाख रुपयांना आणि तब्बल साठ वर्षांच्या लीझवर या अधिकार्‍यांना दिली. या इमारतीत एकूण 80 आयएएस आणि आयपीएस अधिकारी राहतात. सिडकोच्या एकूण किंमतीनुसार प्रत्येक अधिकार्‍याच्या वाट्याला जागेची किंमत ही केवळ 2 लाख 80 हजार रुपये इतकी आली.

कुठल्याही खुल्या जागेवर उत्तम दर्जाचे बांधकाम केले तर त्यासाठी प्रति स्केअर फूट अंदाजे 1500 रुपये खर्च येतो. वनश्री सोसायटीत झालेल्या बांधकामामध्ये प्रत्येक फ्लॅट हा अंदाजे 2500 स्के.फूटाचा आहे. पंधराशे रुपये दराने बांधकाम केल्यास त्याची मूळ किंमत अंदाजे होते 37 लाख 50 हजार रुपये शिवाय मूळ जागेतला हिस्सा 2 लाख 80 हजार रुपये याच्यासह प्रत्यक्ष फ्लॅटची अंदाजित किंमत होते 40 लाख 30 हजार रुपये. पण नवी मुंबई वेगाने विकसित होणारे शहर आहे. त्यातच विमानतळाला मंजुरी मिळाल्याने आता इथले बाजारभावही वाढले.

या वनश्री मधल्या याच फ्लॅटची बाजारभावनुसार किंमत किती होते.तर 4 पामबिच रोडचा सध्याचा बाजारभाव आहे 10 हजार रुपये स्के.फूट तर वनश्रीमधला अधिकार्‍यांचा एक फ्लॅट आहे अंदाजे 2500 स्के.फूट सध्याच्या बाजारभावानुसार त्याची किंमत होते अंदाजे 2.50 कोटी रुपये.पण प्रत्यक्षात या बड्या अधिकार्‍यांना हा फ्लॅट त्यांच्या पदरात पडला तो केवळ 40 लाख 30 हजार रुपयांना.

नवी मुंबईत भविष्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल याची या अधिकार्‍यांना कल्पना होती का ? सर्वसामान्यांना परवडणारी घरं न देणारी सिडको मात्र, या बड्या अधिकार्‍यांसाठी तब्बल साठ वर्षांच्या लीझवर 2 एकराची जागा वापरायला कशी काय देते, असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.

वनश्री सोसायटीत या बड्या अधिकार्‍यांचे फ्लॅट

1) जे. पी. डांगेराज्याचे मुख्य सचिव2) जयराज फाटकबीएमसीचे माजी आयुक्त3) उत्तम खोब्रागडेबेस्टचे माजी महाव्यवस्थापक4) किशोर गजभियेसचिव, आदिवासी विभाग5) जयंत कावळेकेंद्रीय ऊर्जा सचिव 6) गोविंद स्वरुपमाजी आएएस अधिकारी7) शरद उपासनीमाजी मुख्य सचिव 8) एम.एस.गिल9) के.पी.रघुवंशीअतिरिक्त महासंचालक, कायदा आणि सुव्यवस्था10) सुरेश जोशीमाजी मुख्य माहिती आयुक्त11) सत्यपाल सिंगअतिरिक्त महासंचालक, आस्थापना12) भगवान सहायमाजी प्रधान सचिव13) स्वाधीन क्षत्रियआयुक्त, बीएमसी14) जी. एस. गिलमाजी एमडी, सिडको16) मालिनी शंकरसचिव, महसूल17) मोरेश्वर अप्पलवारविलासरावांचे माजी सचिव18) इक्बाल चहलआयुक्त, उत्पादन शुल्क19) ओ.पी. गेहरोत्रामाजी प्रधान सचिव20) सुधीर श्रीवास्तव21) एम. रमेशकुमारमाजी अतिरिक्त मुख्य सचिव22) शैलेशकुमार शर्मा

तर दूसरीकडे आदर्श सोसायटीमध्ये यातल्याच काही अधिकार्‍यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना फ्लॅट मिळाले. त्याअगोदर वनश्री सोसायटीमध्ये याच अधिकार्‍यांचे फ्लॅट आहेत. अशाप्रकारे दोन -दोन ठिकाणी आपल्या किंवा आपल्या नातेवाईकांच्या नावावर फ्लॅट घेणारे अधिकारी कोण आहेत.

'आदर्श' वनश्रीधारक

1) जयराज फाटकमाजी आयुक्त बीएमसी2) उत्तम खोब्रागडेबेस्टचे माजी महाव्यवस्थापक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2010 04:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close