S M L

संसदेचं कामकाज 20 व्या दिवशीही ठप्प

09 डिसेंबर आज 20 व्या दिवशीही संसदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. जेपीसीच्या मागणीवरून संसदेतली कोंडी कायमच आहे. संसदेच्या इतिहासात एवढे दिवस कामकाज बंद राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2 जी प्रकरणाची संसदेच्या संयुक्त समिती मार्फत चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षांची आहे. पण सरकार मात्र अशा चौकशीसाठी तयार नाही. या आधीही जेपीसीच्याच मुद्यावरून संसदेचं कामकाज सर्वाधिकाळ बंद राहिलं होतं. 1987 मध्ये बोफोर्स प्रकरणाची जेपीसीमार्फत चौकशी करावी यासाठी विरोधी पक्षांनी 19 दिवस तर हर्षद मेहेताच्या शेअर बाजार घोटाळ्याची चौकशीसाठी याच मुद्यावर 16 दिवस कामकाज बंद पाडलं होतं. या दोनही वेळी सरकारनं जेपीसीची मागणी मान्य केली होती. संसद ठप्प असल्यानं कोट्यवधी रूपये पाण्यात गेले असा आरोप करण्यात येतोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 9, 2010 02:00 PM IST

संसदेचं कामकाज 20 व्या दिवशीही ठप्प

09 डिसेंबर

आज 20 व्या दिवशीही संसदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. जेपीसीच्या मागणीवरून संसदेतली कोंडी कायमच आहे. संसदेच्या इतिहासात एवढे दिवस कामकाज बंद राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2 जी प्रकरणाची संसदेच्या संयुक्त समिती मार्फत चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षांची आहे. पण सरकार मात्र अशा चौकशीसाठी तयार नाही. या आधीही जेपीसीच्याच मुद्यावरून संसदेचं कामकाज सर्वाधिकाळ बंद राहिलं होतं. 1987 मध्ये बोफोर्स प्रकरणाची जेपीसीमार्फत चौकशी करावी यासाठी विरोधी पक्षांनी 19 दिवस तर हर्षद मेहेताच्या शेअर बाजार घोटाळ्याची चौकशीसाठी याच मुद्यावर 16 दिवस कामकाज बंद पाडलं होतं. या दोनही वेळी सरकारनं जेपीसीची मागणी मान्य केली होती. संसद ठप्प असल्यानं कोट्यवधी रूपये पाण्यात गेले असा आरोप करण्यात येतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2010 02:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close