S M L

सनदी अधिकार्‍यांवर कारवाई करावी - नीलम गोर्‍हे

10 डिसेंबरनागपूर अधिवेशनात आजचा दिवस आंदोलनामुळे गाजला तर दूसरीकडे भ्रष्ट मार्गानं संपत्ती जमवणार्‍या सनदी अधिकार्‍यांना चाप लावण्यासाठी सरकारने त्यांच्या मालमत्तेचे माहिती देण्याची सक्ती केली मात्र बहुतांश अधिकारी मालमत्तेचे तपशीलच देत नसल्याचे आढळून आले आहे.अशा सनदी अधिकार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी आज शिवसेना प्रवक्त्या नीलम गोर्‍हे यांनी आज विधिमंडळात केली. आयबीएन लोकमतने काल याचसंदर्भातले वृत्त प्रसारित केले होते. विकिलीक्सच्या केबल्समध्ये आरएसएसचा उल्लेख -आझमी विधानसभेत अबू आझमी यांनी औचित्याचा मुद्दा मांडला. विकिलीक्सच्या केबल्समध्ये आरएसएसचा उल्लेख असल्याचा उल्लेख अबू आझमी यांनी केला.आणि त्यानंतर विधानसभेत गोंधळ उडाला.अबू आझमींनी आरएसएसचा उल्लेख केल्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला आणि निषेध नोंदवत सभात्याग केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 10, 2010 02:29 PM IST

सनदी अधिकार्‍यांवर कारवाई करावी - नीलम गोर्‍हे

10 डिसेंबर

नागपूर अधिवेशनात आजचा दिवस आंदोलनामुळे गाजला तर दूसरीकडे भ्रष्ट मार्गानं संपत्ती जमवणार्‍या सनदी अधिकार्‍यांना चाप लावण्यासाठी सरकारने त्यांच्या मालमत्तेचे माहिती देण्याची सक्ती केली मात्र बहुतांश अधिकारी मालमत्तेचे तपशीलच देत नसल्याचे आढळून आले आहे.अशा सनदी अधिकार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी आज शिवसेना प्रवक्त्या नीलम गोर्‍हे यांनी आज विधिमंडळात केली. आयबीएन लोकमतने काल याचसंदर्भातले वृत्त प्रसारित केले होते.

विकिलीक्सच्या केबल्समध्ये आरएसएसचा उल्लेख -आझमी

विधानसभेत अबू आझमी यांनी औचित्याचा मुद्दा मांडला. विकिलीक्सच्या केबल्समध्ये आरएसएसचा उल्लेख असल्याचा उल्लेख अबू आझमी यांनी केला.आणि त्यानंतर विधानसभेत गोंधळ उडाला.अबू आझमींनी आरएसएसचा उल्लेख केल्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला आणि निषेध नोंदवत सभात्याग केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2010 02:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close