S M L

लवासाची मूळ कल्पना माझीच - शरद पवार

11 डिसेंबरतो मी नव्हेच.. अशी लवासा बाबत पवार कुटुंबियांची भूमिका होती. पण आता शरद पवारांनी कबूल केलंय की लवासा ही त्यांचीच मूळ कल्पना असून जागाही त्यांनीच निवडली आहे.शरद पवारांवर लिहिलेल्या तेजोनिधी या पुस्तकात पवारांनी ही कबुली दिली. शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांच्याच दिल्लीतील घरी या पुस्तकाचे प्रकाशन झाले. पुस्तकाचे लेखक सुभाष शिंदे यांना दिलेल्या मुलाखतीत पवार म्हणतात की लवासा ही माझीच संकल्पना असून जागाही मीच निवडली आहे. विकासक अजित गुलाबचंद यांना लवासा विकसित करण्यासाठी मीच बोलवलं असंही पवार म्हणतात. अलिकडच्या वादाबद्दल ते म्हणतात की जर काही चूक असेल तर कारवाई व्हावी, पण काम मात्र थांबवलं जाऊ नये. शरद पवार म्हणतात..'ही गोष्ट 100 टक्के खरी आहे की, लवासाची जागा मीच निवडली आणि नक्की केली. सह्याद्री डोंगरांमध्ये काही ठिकाणे विकसित केली पाहिजेत, असं मला वाटत होते. त्यातलं लवासा हे एक ठिकाण. एक दिवस मी तिथं हेलिकॉप्टर उतरवलं, सगळं पाहिलं. उत्तम निसर्ग सौंदर्य... नंतर आम्ही चौकशी केली की इथं कोणी राहतं का. मग सगजलं इथं कोणीही राहत नाही. ही सगळी धरणामध्ये गेलेली जमीन. तिथले सगळे लोक दुसरीकडे शिफ्ट झालेले होते. तेथून साधारण 25 किमी अंतरावर 500 ते 700 लोक राहत होते. 100 टक्के खरं आहे की, मी अजित गुलाबचंद यांना आपण यामध्ये लक्ष घालावं, असं सांगितलं. एक दिवस मी त्यांना म्हटलं, अजित, तुझी एवढी मोठी कंस्ट्रक्शन कंपनी आहे. अशी अशी एक जागा मोसे खोर्‍यात आहे आणि हा स्पॉट विकसित होऊ शकतो. तिथं पॉप्युलेशन नाही, पडीक जमिनी आहेत आणि वॉटरवॉलही आहे. आता लवासामध्ये गेली 7 वर्षं त्यानं त्याच्यावर काम करून जमिनी घेतल्या डेव्हलप केल्या. त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या असतील, तर त्यांच्यावर कारवाई करावी, पण प्रक्रियेला आपण थांबवू नये. मला असं वाटतं, ते जे करत आहेत, ते एक महत्त्वाचं काम आहे.'- शरद पवार

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 11, 2010 05:15 PM IST

लवासाची मूळ कल्पना माझीच - शरद पवार

11 डिसेंबर

तो मी नव्हेच.. अशी लवासा बाबत पवार कुटुंबियांची भूमिका होती. पण आता शरद पवारांनी कबूल केलंय की लवासा ही त्यांचीच मूळ कल्पना असून जागाही त्यांनीच निवडली आहे.

शरद पवारांवर लिहिलेल्या तेजोनिधी या पुस्तकात पवारांनी ही कबुली दिली. शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांच्याच दिल्लीतील घरी या पुस्तकाचे प्रकाशन झाले. पुस्तकाचे लेखक सुभाष शिंदे यांना दिलेल्या मुलाखतीत पवार म्हणतात की लवासा ही माझीच संकल्पना असून जागाही मीच निवडली आहे. विकासक अजित गुलाबचंद यांना लवासा विकसित करण्यासाठी मीच बोलवलं असंही पवार म्हणतात. अलिकडच्या वादाबद्दल ते म्हणतात की जर काही चूक असेल तर कारवाई व्हावी, पण काम मात्र थांबवलं जाऊ नये.

शरद पवार म्हणतात..

'ही गोष्ट 100 टक्के खरी आहे की, लवासाची जागा मीच निवडली आणि नक्की केली. सह्याद्री डोंगरांमध्ये काही ठिकाणे विकसित केली पाहिजेत, असं मला वाटत होते. त्यातलं लवासा हे एक ठिकाण. एक दिवस मी तिथं हेलिकॉप्टर उतरवलं, सगळं पाहिलं. उत्तम निसर्ग सौंदर्य... नंतर आम्ही चौकशी केली की इथं कोणी राहतं का. मग सगजलं इथं कोणीही राहत नाही. ही सगळी धरणामध्ये गेलेली जमीन. तिथले सगळे लोक दुसरीकडे शिफ्ट झालेले होते. तेथून साधारण 25 किमी अंतरावर 500 ते 700 लोक राहत होते. 100 टक्के खरं आहे की, मी अजित गुलाबचंद यांना आपण यामध्ये लक्ष घालावं, असं सांगितलं. एक दिवस मी त्यांना म्हटलं, अजित, तुझी एवढी मोठी कंस्ट्रक्शन कंपनी आहे. अशी अशी एक जागा मोसे खोर्‍यात आहे आणि हा स्पॉट विकसित होऊ शकतो. तिथं पॉप्युलेशन नाही, पडीक जमिनी आहेत आणि वॉटरवॉलही आहे. आता लवासामध्ये गेली 7 वर्षं त्यानं त्याच्यावर काम करून जमिनी घेतल्या डेव्हलप केल्या. त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या असतील, तर त्यांच्यावर कारवाई करावी, पण प्रक्रियेला आपण थांबवू नये. मला असं वाटतं, ते जे करत आहेत, ते एक महत्त्वाचं काम आहे.'- शरद पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2010 05:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close