S M L

मुंबई-गोवा हायवेवर अपघातात 10 ठार

12 डिसेंबररत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात उधळे गावाजवळ मुंबई- गोवा हायवेवर व्होल्वो आणि तव्हेरा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 10 जण ठार झालेत. यामध्ये पाच महिलांचाही समावेश आहे. मृतांमध्ये मुंबईतल्या भांडुपच्या खेतले कुटुंबाचा समावेश आहे. तर व्होल्वोचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाला. खेतले कुटुंब भांडूप पूर्वच्या नवजीवन सोसायटीमधील रहिवासी आहेत. खेतले कुटुंबीय मुलीचे लग्न ठरविण्यासाठी गावी जात असतांना हा अपघात झाला. हे सगळेजण गुहागर तालुक्यातल्या कुटगिरी गावाकडे जात होते. कशेडी घाटात पहाटे सव्वा चारच्या सुमारास हा अपघात झाला. पावलो ट्रॅव्हल्सची व्होल्वो बस गोव्याहून मुंबईला जात होती. तर खेतले कुटुंबियांची तव्हेरा मुंबईहून गुहागरला जात होती. वाटेत उधळे गावाजवळ दोघांची टक्कर झाली. अपघातातील मृतांवर त्यांच्या मूळ गावी गुहागर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 12, 2010 10:36 AM IST

मुंबई-गोवा हायवेवर अपघातात 10 ठार

12 डिसेंबर

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात उधळे गावाजवळ मुंबई- गोवा हायवेवर व्होल्वो आणि तव्हेरा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 10 जण ठार झालेत. यामध्ये पाच महिलांचाही समावेश आहे. मृतांमध्ये मुंबईतल्या भांडुपच्या खेतले कुटुंबाचा समावेश आहे. तर व्होल्वोचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाला. खेतले कुटुंब भांडूप पूर्वच्या नवजीवन सोसायटीमधील रहिवासी आहेत. खेतले कुटुंबीय मुलीचे लग्न ठरविण्यासाठी गावी जात असतांना हा अपघात झाला. हे सगळेजण गुहागर तालुक्यातल्या कुटगिरी गावाकडे जात होते. कशेडी घाटात पहाटे सव्वा चारच्या सुमारास हा अपघात झाला. पावलो ट्रॅव्हल्सची व्होल्वो बस गोव्याहून मुंबईला जात होती. तर खेतले कुटुंबियांची तव्हेरा मुंबईहून गुहागरला जात होती. वाटेत उधळे गावाजवळ दोघांची टक्कर झाली. अपघातातील मृतांवर त्यांच्या मूळ गावी गुहागर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2010 10:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close