S M L

शरद पवार यांच्या बंगल्या समोर उपोषणाला बसण्याचा रंजन तावरेंचा इशारा

13 डिसेंबरमाळेगाव कारखान्यात ऊसाला पहिला हप्ता दोन हजार रुपये द्यावा. नाहीतर कृषीमंत्री शरद पवार यांच्या बंगल्या समोर हजारो शेतकरी उपोषणाला बसतील असा इशारा शेतकरी कृती समितीचे प्रमुख रंजन तावरे यांनी दिला. त्यामुळे पवार यांच्या बारामती इथल्या गोविंदबाग या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ऊसाला पहिला हप्ता दोन हजार द्यावा या मागणीसाठी माळेगाव साखर कारखान्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. ऊस उत्पादकांनी उसाला कोयता लावू न देण्याची भूमिका घेतल्याने माळेगाव कारखान्याच्या गाळपावर परिणाम झाला. ऊसाअभावी काल(रवीवारी) कारखान्याने क्लिनिंग घोषित केले. रवीवारी शेतकरी कृती समितीचे प्रमुख रंजन तावरे यांना अटक करण्यात आली होती. तावरे यांच्या अटकेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. तर शेतकर्‍यांनी इथं रास्ता रोको आंदोलनही करण्यात केले. इथलं वातावरण अजुन चिघळू नये त्यामुळे पवारांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2010 09:40 AM IST

शरद पवार यांच्या बंगल्या समोर उपोषणाला बसण्याचा रंजन तावरेंचा इशारा

13 डिसेंबर

माळेगाव कारखान्यात ऊसाला पहिला हप्ता दोन हजार रुपये द्यावा. नाहीतर कृषीमंत्री शरद पवार यांच्या बंगल्या समोर हजारो शेतकरी उपोषणाला बसतील असा इशारा शेतकरी कृती समितीचे प्रमुख रंजन तावरे यांनी दिला. त्यामुळे पवार यांच्या बारामती इथल्या गोविंदबाग या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ऊसाला पहिला हप्ता दोन हजार द्यावा या मागणीसाठी माळेगाव साखर कारखान्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. ऊस उत्पादकांनी उसाला कोयता लावू न देण्याची भूमिका घेतल्याने माळेगाव कारखान्याच्या गाळपावर परिणाम झाला. ऊसाअभावी काल(रवीवारी) कारखान्याने क्लिनिंग घोषित केले. रवीवारी शेतकरी कृती समितीचे प्रमुख रंजन तावरे यांना अटक करण्यात आली होती. तावरे यांच्या अटकेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. तर शेतकर्‍यांनी इथं रास्ता रोको आंदोलनही करण्यात केले. इथलं वातावरण अजुन चिघळू नये त्यामुळे पवारांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2010 09:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close