S M L

ए राजांची चौकशी होणार नाही !

13 डिसेंबर2 जी स्पेक्ट्रम घोटाळयाप्रकरणी न्यायमूर्ती शिवराज पाटील यांची एकसदस्यीय समिती चौकशीला सुरुवात करणार आहे. पण ए. राजा यांच्यासह कोणत्याच माजी दूरसंचार मंत्र्यांची चौकशी केली जाणार नाही असं पाटील यांनी स्पष्ट केले. फक्त स्पेक्ट्रम वाटपाची प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवली गेली की नाही, याचा तपास केला जाणार आहे. चौकशीत दूरसंचार विभागाच्या अंतर्गत कामकाजावर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे. सीबीआयसह इतर संस्थाकडून सुरू असलेल्या मुद्द्यांना चौकशी समिती स्पर्श करणार नसल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान दूरसंचार मंत्रालयाने कंपन्यांना कारणे दाखवा नोटीसी पाठवायला सुरूवात केली आहे. दूरसंचार सचिव आर. चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली. आठवड्याभरात सर्वांना नोटीसी देण्याचे काम पूर्ण होणार आहे. सुरूवातीला 5 कंपन्यांचे 85 परवाने रद्द करण्याबाबतच्या नोटीशी पाठवल्या जाणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2010 01:26 PM IST

ए राजांची चौकशी होणार नाही !

13 डिसेंबर

2 जी स्पेक्ट्रम घोटाळयाप्रकरणी न्यायमूर्ती शिवराज पाटील यांची एकसदस्यीय समिती चौकशीला सुरुवात करणार आहे. पण ए. राजा यांच्यासह कोणत्याच माजी दूरसंचार मंत्र्यांची चौकशी केली जाणार नाही असं पाटील यांनी स्पष्ट केले. फक्त स्पेक्ट्रम वाटपाची प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवली गेली की नाही, याचा तपास केला जाणार आहे. चौकशीत दूरसंचार विभागाच्या अंतर्गत कामकाजावर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे. सीबीआयसह इतर संस्थाकडून सुरू असलेल्या मुद्द्यांना चौकशी समिती स्पर्श करणार नसल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान दूरसंचार मंत्रालयाने कंपन्यांना कारणे दाखवा नोटीसी पाठवायला सुरूवात केली आहे. दूरसंचार सचिव आर. चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली. आठवड्याभरात सर्वांना नोटीसी देण्याचे काम पूर्ण होणार आहे. सुरूवातीला 5 कंपन्यांचे 85 परवाने रद्द करण्याबाबतच्या नोटीशी पाठवल्या जाणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2010 01:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close