S M L

पेण अर्बन बँक प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल होणार

14 डिसेंबरपेण अर्बन बँकेच्या 511 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी आता सर्व संचालक मंडळीची मालमत्ता जप्त केली जाणार आहे. एकुण 109 कर्जवाटप प्रकरणात घोटाळा झाल्याची माहिती आज सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. या प्रकरणाची त्याची सीबीआय चौकशी सुरु आहे. पेण अर्बनच्या एकूण 19 शाखा आहे. त्यातला पेण, गिरगाव आणि विले पार्ले या शाखांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरण जे कुणी दोषी आढळतील त्या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असंही हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर या बँकेचे ज्या 3 ऑडिटर्सनी ऑडिट केले त्यांना ब्लॅक लिस्टेड करण्यात आलं आहे. तर आता किर्तने आणि पंडित या ऑडिट कंपनीला नव्याने ऑडिट करण्यास सांगण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2010 10:10 AM IST

पेण अर्बन बँक प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल होणार

14 डिसेंबर

पेण अर्बन बँकेच्या 511 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी आता सर्व संचालक मंडळीची मालमत्ता जप्त केली जाणार आहे. एकुण 109 कर्जवाटप प्रकरणात घोटाळा झाल्याची माहिती आज सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. या प्रकरणाची त्याची सीबीआय चौकशी सुरु आहे. पेण अर्बनच्या एकूण 19 शाखा आहे. त्यातला पेण, गिरगाव आणि विले पार्ले या शाखांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरण जे कुणी दोषी आढळतील त्या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असंही हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर या बँकेचे ज्या 3 ऑडिटर्सनी ऑडिट केले त्यांना ब्लॅक लिस्टेड करण्यात आलं आहे. तर आता किर्तने आणि पंडित या ऑडिट कंपनीला नव्याने ऑडिट करण्यास सांगण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2010 10:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close