S M L

शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांचा सभागृहात राडा

14 डिसेंबरनाशिक शिवसेनेचा अंतर्गत राडा आज चक्क सभागृहातच पाहायला मिळाला. शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये थेट महानगरपालिकेच्या सभागृहातच बाचाबाची झाली. सभागृहाच्या कामकाजाची जबाबदारी असलेल्या सभागृह नेते सुधाकर बडगुजर यांनी थेट सेनेच्या महानगरप्रमुखांना सभागृहातच शिवीगाळ केली. बडगुजर आणि बोरस्ते यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सभागृहाबाहेर जुपली. इतकंच नाही, तर वॉर्डातल्या कामांच्या वादावरून सेनेच्या नगरसेविका कल्पना पांडे यांनी सेनेचे तानाजी फडोळ यांच्यावर चक्क पाण्याचा ग्लास फेकला. शिवसेनेतल्या अंतर्गत कलहामुळे सेनेच्या महापौरांवर शेवटी सभा तहकूब करण्याची नामुष्की आली. यावर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. राडा घालणारे नगरसेवक आपल्या शहराचा कारभार काय चालवणार हाच प्रश्न नाशिककर विचारू लागतेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2010 10:20 AM IST

शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांचा सभागृहात राडा

14 डिसेंबर

नाशिक शिवसेनेचा अंतर्गत राडा आज चक्क सभागृहातच पाहायला मिळाला. शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये थेट महानगरपालिकेच्या सभागृहातच बाचाबाची झाली. सभागृहाच्या कामकाजाची जबाबदारी असलेल्या सभागृह नेते सुधाकर बडगुजर यांनी थेट सेनेच्या महानगरप्रमुखांना सभागृहातच शिवीगाळ केली. बडगुजर आणि बोरस्ते यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सभागृहाबाहेर जुपली. इतकंच नाही, तर वॉर्डातल्या कामांच्या वादावरून सेनेच्या नगरसेविका कल्पना पांडे यांनी सेनेचे तानाजी फडोळ यांच्यावर चक्क पाण्याचा ग्लास फेकला. शिवसेनेतल्या अंतर्गत कलहामुळे सेनेच्या महापौरांवर शेवटी सभा तहकूब करण्याची नामुष्की आली. यावर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. राडा घालणारे नगरसेवक आपल्या शहराचा कारभार काय चालवणार हाच प्रश्न नाशिककर विचारू लागतेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2010 10:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close