S M L

वर्ल्ड नंबर वन सायना मायदेशी जंगी स्वागत

14 डिसेंबरहाँगकाँग ओपन सुपर सीरिज जिंकल्यानंतर सायना नेहवाल काल उशिरा हैद्राबादमध्ये परतली. आता लगेचच ती इंडियन ओपन ग्रँड प्रिक्स स्पर्धेत सहभागी होणार आहे. हैद्राबादच्या विजय भास्कर रेड्डी इनडोअर स्टेडिअममध्ये ही स्पर्धा आजपासून सुरु होईल. या स्पर्धेनंतर मात्र सायना आठवड्याभरासाठी विश्रांती घेईल. आणि पुढच्या हंगामासाठी तयारीला सुरुवात करेल. हाँगकाँग स्पर्धेतल्या विजेतेपदामुळे या हंगामाच्या अखेरीला होणार्‍या सुपर सीरिज फायनल स्पर्धेसाठी ती क्वालिफाय झाली. ही स्पर्धा चायनीज तैपेईमध्ये येत्या पाच ते नऊ जानेवारी दरम्यान होणार आहे. पण या स्पर्धेत सायना खेळणार की नाही, याचा निर्णय तिने अजून घेतलेला नाही. मागची दोन वर्षं या स्पर्धेत सायना सेमी फायनलपर्यंत पोहोचली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2010 10:36 AM IST

वर्ल्ड नंबर वन सायना मायदेशी जंगी स्वागत

14 डिसेंबर

हाँगकाँग ओपन सुपर सीरिज जिंकल्यानंतर सायना नेहवाल काल उशिरा हैद्राबादमध्ये परतली. आता लगेचच ती इंडियन ओपन ग्रँड प्रिक्स स्पर्धेत सहभागी होणार आहे. हैद्राबादच्या विजय भास्कर रेड्डी इनडोअर स्टेडिअममध्ये ही स्पर्धा आजपासून सुरु होईल. या स्पर्धेनंतर मात्र सायना आठवड्याभरासाठी विश्रांती घेईल. आणि पुढच्या हंगामासाठी तयारीला सुरुवात करेल. हाँगकाँग स्पर्धेतल्या विजेतेपदामुळे या हंगामाच्या अखेरीला होणार्‍या सुपर सीरिज फायनल स्पर्धेसाठी ती क्वालिफाय झाली. ही स्पर्धा चायनीज तैपेईमध्ये येत्या पाच ते नऊ जानेवारी दरम्यान होणार आहे. पण या स्पर्धेत सायना खेळणार की नाही, याचा निर्णय तिने अजून घेतलेला नाही. मागची दोन वर्षं या स्पर्धेत सायना सेमी फायनलपर्यंत पोहोचली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2010 10:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close