S M L

अनिल आणि इरफान 'स्लमडॉग मिलिअनेअर' हॉलिवुडपटात

1 नोव्हेंबर, लंडन आकांक्षा बॅनर्जीभारतीय कलाकारांनी हॉलिवुड सिनेमांमध्ये काम करणं ही गोष्ट आता काही नवीन राहिलेली नाही. या यादीत आता अनिल कपूर आणि इरफान खान यांची भर पडली आहे. या दोघांची मुख्य भूमिका असलेल्या 'स्लमडॉग मिलिअनेअर' या सिनेमाचा लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये गौरव करण्यात आला. यापूर्वी टेल्युराईड आणि टोरांटो फेस्टिवलमध्येही या सिनेमाचं कौतुक झालं होतं. लंडन फिल्म फेस्टिव्हलचा ग्रँड फिनाले नुकताच झाला. त्यावेळी डॅनी बोएलच्या 'स्लमडॉग मिलिअनेअर' सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग ठेवलं होतं. न्यूयॉर्क आणि टोरांटोमध्ये 'स्लमडॉग मिलिअनेअर'चं कौतुक झाल्यानंतर लंडनमध्येही लक्ष वेधून घेण्याचा कलाकरांचा प्रयत्न होता. 'स्लमडॉग मिलिअनेअर'च्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी सिनेमाचा नायक अनिल कपूर, संगीतकार ए.आर. रहमान, दिग्दर्शक डॅनी बोएल हजर होते. 'प्रेक्षकांनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे. हा ब्रिटीश प्रॉडक्शनचा हा सिनेमा आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने लंडनमधलं स्क्रिनिंग तर फारच महत्त्वाचं आहे,' असं अनिल कपूर म्हणाला. 'मी सिनेमा पाहिला. मला आवडला आहे. या सिनेमात संगीतासाठी मोठी संधी आहे, असं संगीतकार ए.आर.रहमान म्हणाला. 'स्लमडॉग मिलिअनेअर' या सिनेमाचं सगळं शुटिंग मुंबईतच झालं आहे. झोपडपट्टीत राहणारा जमाल मलिक टीव्ही शोमध्ये वीस लाख रुपये जिंकतो आणि त्याचं आयुष्यच बदलतं..अशी या सिनेमाची कहाणी आहे. अनिल कपूरबरोबरच इरफान खान आणि सौरभ शुक्लासुध्दा सिनेमात आहेत. अर्थात, या सिनेमात 'मॅक्झिमम सिटी' या पुस्तकाचा वाटाही मोठा आहे. या सिनेमाला टोरांटोमध्ये 'पीपल्स चॉईस' हा अ‍ॅवॉर्ड मिळाला होता आणि त्यामुळे हा सिनेमा पुढच्या ऑस्करसाठी दावेदारी सांगू शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 1, 2008 10:00 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2008 10:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close