S M L

मुंबई गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा

14 डिसेंबरखेडमधे तवेरा गाडीला झालेल्या अपघातामुळे मुंबई - गोवा हायवेवरची सुरक्षा धोक्यात असल्याचं स्पष्ट झालं आहे. या अपघातात गाडीतल्या खेतले कुटुंबातील सगळया प्रवाशांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षभरापासून मुंबई गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरला आहे. अनेक ठिकाणी अरुंद वळणांमुळे होणा-या अपघातांबरोबरच ओव्ह्ररलोड, मद्यपान, अतिआत्मविश्वास आणि सदोष ड्रायव्हींगमुळे अपघात होऊन अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहेत. त्यामुळे कोकणातले प्रवासी धास्तावले आहे.अपघाताची आकडेवारी रत्नागिरी जिल्हा :1: गेल्या 11 महिन्यात महामार्गावर 300 अपघात 2: यातील 75 अपघातांमध्ये 106 जणांचा मृत्यू 3: तर 225 अपघातांत 526 जण गंभीर जखमी 4: जिल्ह्यातल्या इतर मार्गावरही 360 अपघात 5 : यातल्या 54 अपघातात 59 ठार 6 : तर 180 अपघातात 316 जखमी सिंधुदुर्ग जिल्हा :1: गेल्या दीड वर्षात महामार्गावर 395 अपघात 2: 90 जणांचा मृत्यू 3: 165 गंभीर जखमी तर 366 किरकोळ जखमी रायगड जिल्हा :-1) गेल्या 11 महिन्यात 182 अपघात, त्यात2) 147 जणांचा मृत्यू तर 523 जण जखमी झाले आहेत मुंबई गोवा महामार्गावरची धोकादायक ठिकाणं 1: संगमेश्वर जवळ आरवली ते बावनदी हा भाग सर्वाधिक धोकादायक 2: चिपळूणजवळ परशुराम घाट 3: रत्नागिरीजवळ हातखंबा ते पाली दरम्यानचा भाग 4: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण जवळचा नडगिवे घाट 5: सावंतवाडी ते गोवा दरम्यानचा इन्सुली घाट6 : कुडाळ ते सावंतवाडी दरम्यानचा तेर्सेबांबर्डे भाग 7 : खेड जवळचा कशेडी घाटयातले अनेक अपघात हे सुट्टीच्या कालावधीत झालेले आहेत. गोवा आणि कोकणात येणारे अनेक पर्यटक हे महामार्गाचा अंदाज न घेता आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता वेगाने वाहनं चालवून अपघात ओढवून घेत असल्याचे वाहतूक पोलीसांच्या निदर्शनास आलं. सिंधुदुर्गातून जाणारा महामार्ग तर केवळ खड्‌ड्यांचाच झाल्याने रात्रीच्या वेळी या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होतात.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2010 12:35 PM IST

मुंबई गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा

14 डिसेंबर

खेडमधे तवेरा गाडीला झालेल्या अपघातामुळे मुंबई - गोवा हायवेवरची सुरक्षा धोक्यात असल्याचं स्पष्ट झालं आहे. या अपघातात गाडीतल्या खेतले कुटुंबातील सगळया प्रवाशांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षभरापासून मुंबई गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरला आहे. अनेक ठिकाणी अरुंद वळणांमुळे होणा-या अपघातांबरोबरच ओव्ह्ररलोड, मद्यपान, अतिआत्मविश्वास आणि सदोष ड्रायव्हींगमुळे अपघात होऊन अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहेत. त्यामुळे कोकणातले प्रवासी धास्तावले आहे.

अपघाताची आकडेवारी

रत्नागिरी जिल्हा :

1: गेल्या 11 महिन्यात महामार्गावर 300 अपघात 2: यातील 75 अपघातांमध्ये 106 जणांचा मृत्यू 3: तर 225 अपघातांत 526 जण गंभीर जखमी 4: जिल्ह्यातल्या इतर मार्गावरही 360 अपघात 5 : यातल्या 54 अपघातात 59 ठार 6 : तर 180 अपघातात 316 जखमी

सिंधुदुर्ग जिल्हा :

1: गेल्या दीड वर्षात महामार्गावर 395 अपघात 2: 90 जणांचा मृत्यू 3: 165 गंभीर जखमी तर 366 किरकोळ जखमी

रायगड जिल्हा :-

1) गेल्या 11 महिन्यात 182 अपघात, त्यात2) 147 जणांचा मृत्यू तर 523 जण जखमी झाले आहेत

मुंबई गोवा महामार्गावरची धोकादायक ठिकाणं

1: संगमेश्वर जवळ आरवली ते बावनदी हा भाग सर्वाधिक धोकादायक 2: चिपळूणजवळ परशुराम घाट 3: रत्नागिरीजवळ हातखंबा ते पाली दरम्यानचा भाग 4: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण जवळचा नडगिवे घाट 5: सावंतवाडी ते गोवा दरम्यानचा इन्सुली घाट6 : कुडाळ ते सावंतवाडी दरम्यानचा तेर्सेबांबर्डे भाग 7 : खेड जवळचा कशेडी घाट

यातले अनेक अपघात हे सुट्टीच्या कालावधीत झालेले आहेत. गोवा आणि कोकणात येणारे अनेक पर्यटक हे महामार्गाचा अंदाज न घेता आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता वेगाने वाहनं चालवून अपघात ओढवून घेत असल्याचे वाहतूक पोलीसांच्या निदर्शनास आलं. सिंधुदुर्गातून जाणारा महामार्ग तर केवळ खड्‌ड्यांचाच झाल्याने रात्रीच्या वेळी या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2010 12:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close