S M L

कोठेवाडी दरोड्यातील सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

15 डिसेंबरराज्यभरात गाजलेल्या कोठेवाडी दरोड्यातील सहा आरोपींना जन्मठेपेची तर अन्य सहा आरोपींना वेगवेगळ्या गुन्हयांमध्ये तेवीस वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठान आज हा महत्वपूर्ण निकाल दिला. याप्रकरणातील सर्वच्या सर्व म्हणजे बाराही आरोपींवरील आरोप सिध्द झाल्यामुळे त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. नगर जिल्ह्यातील कोठेवाडी येथे पडलेल्या या दरोड्यात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती.नगर जिल्ह्यातील कोठेवाडी येथे 16 जानेवारी 2001 रोजी हा दरोडा पडला होता. या दरोड्यात महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आले होते. याप्रकरणातील बारा आरोपींना नगरच्या जिल्हा न्याायलायन शिक्षा ठोठावली होती. त्यानंंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च नायालयाने ही शिक्षा कायम ठेवली. याप्रकरणात ऍड. व्ही डी सपकाळ यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आली होती. याप्रकणात याप्रकरणात रेंजा धुराजी काळे, बंड्या निलगोर्‍या भोसले, हाब्या पानमळ्या भोसले, गारमन्या खुब्ब्या चव्हाण, राजू वकिल्या भोसले, दारासिंग वकिल्या भोसले या सहा आरोपींना जन्मठेप आणि तेवीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तर डबर्‍या ंदंडुशा भोसले, सुरेश चिंतामण काळे,हनुमंता नताशा भोसले, रताळ्या ढिब्या भोसले, संतोष डिस्चार्ज काळे, चित्या करमाड्या भोसले या सहा आरोपींना वेगवेगळ्या गुन्ह्यात तेवीस वर्षे सक्तमजुरी सुनावण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 15, 2010 10:16 AM IST

कोठेवाडी दरोड्यातील सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

15 डिसेंबर

राज्यभरात गाजलेल्या कोठेवाडी दरोड्यातील सहा आरोपींना जन्मठेपेची तर अन्य सहा आरोपींना वेगवेगळ्या गुन्हयांमध्ये तेवीस वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठान आज हा महत्वपूर्ण निकाल दिला. याप्रकरणातील सर्वच्या सर्व म्हणजे बाराही आरोपींवरील आरोप सिध्द झाल्यामुळे त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. नगर जिल्ह्यातील कोठेवाडी येथे पडलेल्या या दरोड्यात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती.

नगर जिल्ह्यातील कोठेवाडी येथे 16 जानेवारी 2001 रोजी हा दरोडा पडला होता. या दरोड्यात महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आले होते. याप्रकरणातील बारा आरोपींना नगरच्या जिल्हा न्याायलायन शिक्षा ठोठावली होती. त्यानंंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च नायालयाने ही शिक्षा कायम ठेवली. याप्रकरणात ऍड. व्ही डी सपकाळ यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आली होती. याप्रकणात याप्रकरणात रेंजा धुराजी काळे, बंड्या निलगोर्‍या भोसले, हाब्या पानमळ्या भोसले, गारमन्या खुब्ब्या चव्हाण, राजू वकिल्या भोसले, दारासिंग वकिल्या भोसले या सहा आरोपींना जन्मठेप आणि तेवीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तर डबर्‍या ंदंडुशा भोसले, सुरेश चिंतामण काळे,हनुमंता नताशा भोसले, रताळ्या ढिब्या भोसले, संतोष डिस्चार्ज काळे, चित्या करमाड्या भोसले या सहा आरोपींना वेगवेगळ्या गुन्ह्यात तेवीस वर्षे सक्तमजुरी सुनावण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2010 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close