S M L

राज्यात ऊसाचे आंदोलन पेटल

15 डिसेंबरसध्या राज्यभरात ऊसाच्या दरासाठी जोरदार आंदोलन सुरु आहे. आता याच आंदोलनात खासदार राजू शेट्टी उतरल्याने हे आंदोलन आणखीनच तापलं आहे. ऊसाला पहिला हप्ता 2200 रुपये मिळावा यासाठी हे आंदोलन सुरु आहे. पुणे जिल्ह्यातलं माळेगाव, सोमेश्वर साखर कारखान्यांचे काम ठप्प होण्याची वेळ आली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अशा दिग्गजांच्या भागातच हे कारखाने येतात. त्याच परिसरातल्या शेतकर्‍यांनी स्वतःहून ऊसाला कोयता लावून दिल्याने माळेगाव कारखाना उसाअभावी बंद पडला आहे. येत्या दोन दिवसात आंदोलनाची दिशा अधिक तीव्र करण्याचा निर्धार खासदार राजू शेट्टींनी व्यक्त केला.पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यातल्या ऊसाच्या पहिल्या उचलीच्या दरासाठी होणारे शेतकर्‍यांची आंदोलनं चिरडण्याचा केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रयत्न आहे असा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केला. पुरंदरच्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात आंदोलनामुळे ऊसगाळपावर याचा परिणाम झाला. पोलिस बंदोबस्तात ऊस वाहतूक सुरु करण्याचा सोमेश्वरच्या संचालक मंडळाचा प्रयत्न सुरू होता. सोलापूर, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांतील प्रश्नावर येत्या 21 तारखेला पंढरपुरच्या विठोबाचे दर्शन घेउन सर्घष यात्रा काढण्याची घोषणा खासदार राजु शेट्टी यांनी केली आहे. ऊसाला पहिली उचल 2200 रुपये मिळावी यामागणीसाठी मागील पंधरादिवसांपासून सोलापुरातही आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून सोलापुर जिल्हादधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व राजु शेट्टी यांनी केले शेतकरी संघटना, मनसे आणि किसान महासभेनेही सहभाग घेतला होता. जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थीत होते.शेतकर्‍यांना फुलं वाटलीपुणे जिल्ह्यात ऊसाला बावीसशे रुपये भाव मिळावा यासाठी बारामती, सोमेश्वर, माळेगाव इथं आंदोलन सुरु आहेत. मात्र जुन्नर, शिरुर या भागातल्या शेतकर्‍यांनी गांधीगिरी करुन ऊस तोडणी बंद करण्याचे आवाहन केले आहे. ऊसाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी संघटनेने रास्ता रोको केला. पण साखर कारखान्यांनी कोणताही निर्णय अजूनही दिलेला नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्यातल्या विघ्नहर आणि घोडगंगा साखर कारखान्याच्या परिसरात शेतकरी संघटनेने गांधिगिरीचा मार्ग स्विकारला आहे. शेतकर्‍यांनी ऊस तोडणी बंद करावी यासाठी संघटनेच्या कार्यकर्ते शेतकर्‍यांच्या हातात फुलं देत आहेत. साखर सहसंचालकांना घेरावराज्याचे सहकार राज्यमंत्री प्रकाश साळुंके यांच्या माजलगाव सहकारी साखर कारखान्यात ऊसाला चौदाशे रूपये प्रति टन भाव दिला जातो. यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी औरंगाबादच्या साखर सहसंचालकांना घेराव घातला. माजलगाव सहकारी साखर कारखाना आणि जय महेश शुगर लिमिटेड या दोन्ही कारखान्यांनी ऊसाला प्रतिटन 2200 रुपये भाव देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. साखर संहसंचलाकाना निवदेन देण्यात आले. कार्यालयासमोर जमलेल्या शेतकर्‍यांनी यापुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ही दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 15, 2010 02:23 PM IST

राज्यात ऊसाचे आंदोलन पेटल

15 डिसेंबर

सध्या राज्यभरात ऊसाच्या दरासाठी जोरदार आंदोलन सुरु आहे. आता याच आंदोलनात खासदार राजू शेट्टी उतरल्याने हे आंदोलन आणखीनच तापलं आहे. ऊसाला पहिला हप्ता 2200 रुपये मिळावा यासाठी हे आंदोलन सुरु आहे. पुणे जिल्ह्यातलं माळेगाव, सोमेश्वर साखर कारखान्यांचे काम ठप्प होण्याची वेळ आली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अशा दिग्गजांच्या भागातच हे कारखाने येतात. त्याच परिसरातल्या शेतकर्‍यांनी स्वतःहून ऊसाला कोयता लावून दिल्याने माळेगाव कारखाना उसाअभावी बंद पडला आहे. येत्या दोन दिवसात आंदोलनाची दिशा अधिक तीव्र करण्याचा निर्धार खासदार राजू शेट्टींनी व्यक्त केला.

पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यातल्या ऊसाच्या पहिल्या उचलीच्या दरासाठी होणारे शेतकर्‍यांची आंदोलनं चिरडण्याचा केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रयत्न आहे असा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केला. पुरंदरच्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात आंदोलनामुळे ऊसगाळपावर याचा परिणाम झाला. पोलिस बंदोबस्तात ऊस वाहतूक सुरु करण्याचा सोमेश्वरच्या संचालक मंडळाचा प्रयत्न सुरू होता.

सोलापूर, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांतील प्रश्नावर येत्या 21 तारखेला पंढरपुरच्या विठोबाचे दर्शन घेउन सर्घष यात्रा काढण्याची घोषणा खासदार राजु शेट्टी यांनी केली आहे. ऊसाला पहिली उचल 2200 रुपये मिळावी यामागणीसाठी मागील पंधरादिवसांपासून सोलापुरातही आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून सोलापुर जिल्हादधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व राजु शेट्टी यांनी केले शेतकरी संघटना, मनसे आणि किसान महासभेनेही सहभाग घेतला होता. जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

शेतकर्‍यांना फुलं वाटली

पुणे जिल्ह्यात ऊसाला बावीसशे रुपये भाव मिळावा यासाठी बारामती, सोमेश्वर, माळेगाव इथं आंदोलन सुरु आहेत. मात्र जुन्नर, शिरुर या भागातल्या शेतकर्‍यांनी गांधीगिरी करुन ऊस तोडणी बंद करण्याचे आवाहन केले आहे. ऊसाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी संघटनेने रास्ता रोको केला. पण साखर कारखान्यांनी कोणताही निर्णय अजूनही दिलेला नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्यातल्या विघ्नहर आणि घोडगंगा साखर कारखान्याच्या परिसरात शेतकरी संघटनेने गांधिगिरीचा मार्ग स्विकारला आहे. शेतकर्‍यांनी ऊस तोडणी बंद करावी यासाठी संघटनेच्या कार्यकर्ते शेतकर्‍यांच्या हातात फुलं देत आहेत.

साखर सहसंचालकांना घेराव

राज्याचे सहकार राज्यमंत्री प्रकाश साळुंके यांच्या माजलगाव सहकारी साखर कारखान्यात ऊसाला चौदाशे रूपये प्रति टन भाव दिला जातो. यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी औरंगाबादच्या साखर सहसंचालकांना घेराव घातला. माजलगाव सहकारी साखर कारखाना आणि जय महेश शुगर लिमिटेड या दोन्ही कारखान्यांनी ऊसाला प्रतिटन 2200 रुपये भाव देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. साखर संहसंचलाकाना निवदेन देण्यात आले. कार्यालयासमोर जमलेल्या शेतकर्‍यांनी यापुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ही दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2010 02:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close