S M L

नागपूरात मोठ्या प्रमाणात अवैध होर्डिंग्ज

15 डिसेंबरनागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनानिमित्त मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावण्यात आले. त्यासाठी नियमांचे पालन केलं नसल्याचा निर्वाळा देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्याचे मुख्य सचिव जे. पी. डांगे यांच्यासह अनेक बड्या सरकारी अधिका-यांना नोटीस पाठवल्या आहेत. यापूर्वी कोर्टाने अवैध होर्डिंग्जबाबत महानगरपालिकेची कानउघडणी केली होती. पण त्यानंतरही मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावण्यात आले. त्यावर परिवर्तन संस्थेनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केल्याची नोटीस या अधिकार्‍यांना बजावण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 15, 2010 03:24 PM IST

नागपूरात मोठ्या प्रमाणात अवैध होर्डिंग्ज

15 डिसेंबर

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनानिमित्त मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावण्यात आले. त्यासाठी नियमांचे पालन केलं नसल्याचा निर्वाळा देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्याचे मुख्य सचिव जे. पी. डांगे यांच्यासह अनेक बड्या सरकारी अधिका-यांना नोटीस पाठवल्या आहेत. यापूर्वी कोर्टाने अवैध होर्डिंग्जबाबत महानगरपालिकेची कानउघडणी केली होती. पण त्यानंतरही मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावण्यात आले. त्यावर परिवर्तन संस्थेनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केल्याची नोटीस या अधिकार्‍यांना बजावण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2010 03:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close