S M L

औरंगाबादेत नगरसेवकांसह अन्य तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा

15 डिसेंबरऔरंगाबादेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन नगरसेवकांसंह अन्य तिघांविरुद्ध 70 लाख रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अब्दुल साजेद उर्फ साजेद बिल्डर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शेख रऊफ उर्फ खलीलखान यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला. महानगरपालिकेचे इमारत निरीक्षक महमद अन्वर खान यांना साजेद बिल्डर यांच्यासाठी खडंणी वसूल करताना 20 लाख रूपये रोख रकमेसह अटक करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरातील कादरी अन्वर कादरी जहूर यांच्या मालकीची जमिनीची कागदपत्रे खोटी असल्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे कादरी यांनी याप्रकरणी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांच्या सूचनेनुसार 10 लाख रुपये अब्दुल साजेद यांना देण्यात आले. आणि उर्वरीत रकमेपैकी 20 लाख रूपये देण्यासाठी साजेद बिल्डर यांना निरोप देण्यात आला. ही रक्कम स्वीकारण्यासाठी महानगरपालिकेतील इमारत निरीक्षक महमद अन्वर खान कादरी अन्वर यांच्या घरी गेले असता ही कारवाई करण्यात आली.. या प्रकरणात महानगरपालिकेतील काही नगरसेवकांकंडून खंडणी वसूल करण्यासाठी गुंडांच्या टोळ्याच पाळल्या असल्याची माहिती पोलिस तपासात उजेडात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 15, 2010 04:39 PM IST

औरंगाबादेत नगरसेवकांसह अन्य तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा

15 डिसेंबर

औरंगाबादेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन नगरसेवकांसंह अन्य तिघांविरुद्ध 70 लाख रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अब्दुल साजेद उर्फ साजेद बिल्डर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शेख रऊफ उर्फ खलीलखान यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला. महानगरपालिकेचे इमारत निरीक्षक महमद अन्वर खान यांना साजेद बिल्डर यांच्यासाठी खडंणी वसूल करताना 20 लाख रूपये रोख रकमेसह अटक करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरातील कादरी अन्वर कादरी जहूर यांच्या मालकीची जमिनीची कागदपत्रे खोटी असल्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे कादरी यांनी याप्रकरणी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांच्या सूचनेनुसार 10 लाख रुपये अब्दुल साजेद यांना देण्यात आले. आणि उर्वरीत रकमेपैकी 20 लाख रूपये देण्यासाठी साजेद बिल्डर यांना निरोप देण्यात आला. ही रक्कम स्वीकारण्यासाठी महानगरपालिकेतील इमारत निरीक्षक महमद अन्वर खान कादरी अन्वर यांच्या घरी गेले असता ही कारवाई करण्यात आली.. या प्रकरणात महानगरपालिकेतील काही नगरसेवकांकंडून खंडणी वसूल करण्यासाठी गुंडांच्या टोळ्याच पाळल्या असल्याची माहिती पोलिस तपासात उजेडात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2010 04:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close