S M L

आमदारांचं निलंबन रद्द करण्यावरुन मनसे आणि सेनेत जुंपली

16 डिसेंबरशिवसेनेच्या आमदारांच्या निलंबनावरुन मनसेने शिवसेनेला आता टोला हाणला. सेना आमदारांचे निलंबन एकाच अधिवेशनात मागे घेण्यात आलं. मग आता शिवसेनेचे आघाडीसोबत कोणतं डील झालं असा खडा सवाल मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेला विचारला आहे. विधानसभेत गोंधळ घालणार्‍या पाचही शिवसेना आमदराचे निलंबन रद्द करण्यात आलं आहे. अवकाळी पावसाच्या चर्चेदरम्यान अध्यक्षांचा राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला आणि राज्यघटनेचा अवमान केला म्हणून अधिवेशनाच्या दुसर्‍याचं दिवशी 5 शिवसेना आमदारांना एक वर्षासाठी निलंबित केलं होत. आशिष जयस्वाल, रविंद्र वायकर, संजय राठोड, अभिजीत अडसूळ, शरद पाटील या आमदारांवर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 16, 2010 09:48 AM IST

आमदारांचं निलंबन रद्द करण्यावरुन मनसे आणि सेनेत जुंपली

16 डिसेंबर

शिवसेनेच्या आमदारांच्या निलंबनावरुन मनसेने शिवसेनेला आता टोला हाणला. सेना आमदारांचे निलंबन एकाच अधिवेशनात मागे घेण्यात आलं. मग आता शिवसेनेचे आघाडीसोबत कोणतं डील झालं असा खडा सवाल मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेला विचारला आहे.

विधानसभेत गोंधळ घालणार्‍या पाचही शिवसेना आमदराचे निलंबन रद्द करण्यात आलं आहे. अवकाळी पावसाच्या चर्चेदरम्यान अध्यक्षांचा राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला आणि राज्यघटनेचा अवमान केला म्हणून अधिवेशनाच्या दुसर्‍याचं दिवशी 5 शिवसेना आमदारांना एक वर्षासाठी निलंबित केलं होत. आशिष जयस्वाल, रविंद्र वायकर, संजय राठोड, अभिजीत अडसूळ, शरद पाटील या आमदारांवर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2010 09:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close