S M L

पुण्यात 24 ऊस आंदोलकांना अटक

16 डिसेंबरराज्यभरात ऊसाचं आंदोलन दिवसेंदिवस वाढतचं चालले आहे. पुण्यातील सोमेश्वर साखर कारखाना परिसरात आंदोलन करणार्‍या शेतकरी कृषी समितीचे सतीश काकडे यांच्यासह 24 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. या आंदोलकांवर लाठीमारही करण्यात आला होता. या आंदोलकांनी जामीन घ्यायला नकार दिला. त्यामुळे त्यांची रवानगी येरवडा जेलमध्ये करण्यात आली. या आंदोलकांच्या अटकेच्या निषेधार्थ आज निरा शहर, सोमेश्वर नगर, वाणेवाडी परिसरात व्यापार्‍यांनी बंद पुकारला आहे. अहमदनगर येथे पोलीसांकडून मारहाणराज्यात उसाच्या दराचा प्रश्न चांगलाच गाजतो. अहमदनगर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी अद्याप ऊसाला भाव जाहीर केलेले नाहीत. जाहीर केलेत ते भाव 1200 ते 1400 रुपये इतके आहेत. मात्र शेतकर्‍यांची मागणी आहे ऊसाला पहिली उचल 2200 रूपये मिळाली पाहिजे या मागणीसाठी सध्या शेतकरी संघटना जिल्ह्यातील साखर कारख्यान्यांवर ठिय्या आंदोलन करत आहे. मात्र शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्‍या शेतकर्‍याना कारखाना प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून मारहाणीच्या घटना घडत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 16, 2010 12:00 PM IST

पुण्यात 24 ऊस आंदोलकांना अटक

16 डिसेंबर

राज्यभरात ऊसाचं आंदोलन दिवसेंदिवस वाढतचं चालले आहे. पुण्यातील सोमेश्वर साखर कारखाना परिसरात आंदोलन करणार्‍या शेतकरी कृषी समितीचे सतीश काकडे यांच्यासह 24 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. या आंदोलकांवर लाठीमारही करण्यात आला होता. या आंदोलकांनी जामीन घ्यायला नकार दिला. त्यामुळे त्यांची रवानगी येरवडा जेलमध्ये करण्यात आली. या आंदोलकांच्या अटकेच्या निषेधार्थ आज निरा शहर, सोमेश्वर नगर, वाणेवाडी परिसरात व्यापार्‍यांनी बंद पुकारला आहे. अहमदनगर येथे पोलीसांकडून मारहाण

राज्यात उसाच्या दराचा प्रश्न चांगलाच गाजतो. अहमदनगर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी अद्याप ऊसाला भाव जाहीर केलेले नाहीत. जाहीर केलेत ते भाव 1200 ते 1400 रुपये इतके आहेत. मात्र शेतकर्‍यांची मागणी आहे ऊसाला पहिली उचल 2200 रूपये मिळाली पाहिजे या मागणीसाठी सध्या शेतकरी संघटना जिल्ह्यातील साखर कारख्यान्यांवर ठिय्या आंदोलन करत आहे. मात्र शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्‍या शेतकर्‍याना कारखाना प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून मारहाणीच्या घटना घडत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2010 12:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close