S M L

इनरकॉन प्रकल्पाला हायकोर्टाची स्थगिती

15 डिसेंबरखेड तालुक्यातल्या भीमाशंकर अभयारण्याजवळच्या इनरकॉन प्रकल्पाला हायकोर्टाने स्थगिती दिली. इनरकॉनचा इथे पवनचक्क्यांचा प्रकल्प सुरू होता. डिसेंबर 2009 पासून हे काम सुरू होतं. या पवनचक्क्यांसाठी सुमारे 200 एकर जागा घेण्यात आली आहे. तसेच 2 लाख झाडांची बेसुमार कत्तल झाली होती. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी याविरोधात याचिका दाखल केल्यानंतर क ोर्टाने आता या प्रकल्पाला स्थगिती दिली. भीमाशंकर जंगल परिसरात इनरकॉन कंपनीच्या पवनउर्जा प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीची आयबीएन लोकमतनं बातमी दाखवली होती. या प्रकल्पाला ग्रामपंचायत आणि वनरक्षक समितीची परवानगीच नाही. तरीही डोंगरावर वृक्षतोड सुरुच आहे. ब्लास्टिंगची परवानगी नसतानाही, मोठमोठ्या ब्लास्टींग यंत्रणा इथं काम करत आहे. या ब्लास्टचे आवाज आणि दगड परिसरातल्या वस्तीपर्यंत येतात. पण याकडे वनविभाग संपूर्ण दुर्लक्ष करतं आहे. त्यामुळे या भागात 'पश्चिम घाट बचाओ समिती' स्थापन करुन आंदोलन उभारलं जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 16, 2010 12:12 PM IST

इनरकॉन प्रकल्पाला हायकोर्टाची स्थगिती

15 डिसेंबर

खेड तालुक्यातल्या भीमाशंकर अभयारण्याजवळच्या इनरकॉन प्रकल्पाला हायकोर्टाने स्थगिती दिली. इनरकॉनचा इथे पवनचक्क्यांचा प्रकल्प सुरू होता. डिसेंबर 2009 पासून हे काम सुरू होतं. या पवनचक्क्यांसाठी सुमारे 200 एकर जागा घेण्यात आली आहे. तसेच 2 लाख झाडांची बेसुमार कत्तल झाली होती. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी याविरोधात याचिका दाखल केल्यानंतर क ोर्टाने आता या प्रकल्पाला स्थगिती दिली.

भीमाशंकर जंगल परिसरात इनरकॉन कंपनीच्या पवनउर्जा प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीची आयबीएन लोकमतनं बातमी दाखवली होती. या प्रकल्पाला ग्रामपंचायत आणि वनरक्षक समितीची परवानगीच नाही. तरीही डोंगरावर वृक्षतोड सुरुच आहे. ब्लास्टिंगची परवानगी नसतानाही, मोठमोठ्या ब्लास्टींग यंत्रणा इथं काम करत आहे. या ब्लास्टचे आवाज आणि दगड परिसरातल्या वस्तीपर्यंत येतात. पण याकडे वनविभाग संपूर्ण दुर्लक्ष करतं आहे. त्यामुळे या भागात 'पश्चिम घाट बचाओ समिती' स्थापन करुन आंदोलन उभारलं जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2010 12:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close