S M L

कोल्हापूरात अतिक्रमण हटवा मोहिम जोरात सुरु

16 डिसेंबरकोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटवण्याची मोहिम जोरात सुरू आहे. आज सकाळी 6 वाजता पुन्हा या मोहिमेला सुरूवात झाली. मध्यवर्ती बस स्थानकाच्या परिसरात असणार्‍या स्टॉल्स, दुकान गाळे, फेरीवाले यांचा विरोध मोडीत काढत सर्व अतिक्रमणे हटवली. फेरीवाल्यांनी महानगरपालिकेचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. आधी पुनर्वसन करा मग अतिक्रमण काढा अशी भूमिका फेरीवाल्यांनी घेतली. पण अधिकार्‍यांनी फेरीवाल्यांचे काही ही न ऐकता ही कारवाई चालूच ठेवली. कोल्हापुरातले स्थानिक आमदार अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने आमदारांचे विरोध टाळण्यासाठी अतिक्रमण हटवण्याची मोहिम हाती घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 16, 2010 12:21 PM IST

कोल्हापूरात अतिक्रमण हटवा मोहिम जोरात सुरु

16 डिसेंबर

कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटवण्याची मोहिम जोरात सुरू आहे. आज सकाळी 6 वाजता पुन्हा या मोहिमेला सुरूवात झाली. मध्यवर्ती बस स्थानकाच्या परिसरात असणार्‍या स्टॉल्स, दुकान गाळे, फेरीवाले यांचा विरोध मोडीत काढत सर्व अतिक्रमणे हटवली. फेरीवाल्यांनी महानगरपालिकेचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. आधी पुनर्वसन करा मग अतिक्रमण काढा अशी भूमिका फेरीवाल्यांनी घेतली. पण अधिकार्‍यांनी फेरीवाल्यांचे काही ही न ऐकता ही कारवाई चालूच ठेवली. कोल्हापुरातले स्थानिक आमदार अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने आमदारांचे विरोध टाळण्यासाठी अतिक्रमण हटवण्याची मोहिम हाती घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2010 12:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close