S M L

हिंगोलीत गाडी कोसळुन 8 जणांचा मृत्यू

16 डिसेंबरहिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील वाकोडी - ढोलक्याची वाडी या गावाजवळ अपघात झाला. इसापूर धरणाच्या कालव्यात क्रुझर गाडी कोसळून झालेल्या अपघातात 15 प्रवाशांपैकी 8 जणांचा मृत्यू झाला. इतर 7 जणांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलं. 4 जणांचे मृतदेह अजूनही सापडलेले नाहीत. हिंगोली जिल्ह्यातील वसमत इथले रामराव चिभडे हे त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह माहूर इथं दर्शनाला निघाले होते. यावेळी त्यांच्याबरोबर कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याची वाडी, खापरखेडा आणि दरेगाव येथील नातेवाईकही बरोबर होते. दर्शन घेऊन येताना रात्री दहा वाजण्याच्या सुमाराला खापर खेड्‌यातल्या नातेवाईकांना सोडायला जात असताना ही दुर्घटना घडली. क्रुझर जीप चालकाचं नियंत्रण सुटल्यानं जीप इसापूर धरणात वीस फूट खाली कालव्यात कोसळली. यावेळी कालव्यात पाणी सोडलं असल्यानं आठजणांचा मृत्यू झाला. रात्रीच्या अंधारामुळे शोधकार्यात अडचणीत येत होत्या. मृतांची नावे अशी सुमित्राबाई चिभडे, आरती गायकवाड, राहुल चिभडे, कौतिकाबाई धनवे तर वाहून गेलेले बाली धानवे, सागर भिसे, सोनी भिसे आणि सुमित चिभडे याप्रकरणी जीपचालक अनिल दावण याच्याविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 16, 2010 08:26 AM IST

हिंगोलीत गाडी कोसळुन 8 जणांचा मृत्यू

16 डिसेंबर

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील वाकोडी - ढोलक्याची वाडी या गावाजवळ अपघात झाला. इसापूर धरणाच्या कालव्यात क्रुझर गाडी कोसळून झालेल्या अपघातात 15 प्रवाशांपैकी 8 जणांचा मृत्यू झाला. इतर 7 जणांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलं. 4 जणांचे मृतदेह अजूनही सापडलेले नाहीत. हिंगोली जिल्ह्यातील वसमत इथले रामराव चिभडे हे त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह माहूर इथं दर्शनाला निघाले होते. यावेळी त्यांच्याबरोबर कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याची वाडी, खापरखेडा आणि दरेगाव येथील नातेवाईकही बरोबर होते.

दर्शन घेऊन येताना रात्री दहा वाजण्याच्या सुमाराला खापर खेड्‌यातल्या नातेवाईकांना सोडायला जात असताना ही दुर्घटना घडली. क्रुझर जीप चालकाचं नियंत्रण सुटल्यानं जीप इसापूर धरणात वीस फूट खाली कालव्यात कोसळली. यावेळी कालव्यात पाणी सोडलं असल्यानं आठजणांचा मृत्यू झाला. रात्रीच्या अंधारामुळे शोधकार्यात अडचणीत येत होत्या. मृतांची नावे अशी सुमित्राबाई चिभडे, आरती गायकवाड, राहुल चिभडे, कौतिकाबाई धनवे तर वाहून गेलेले बाली धानवे, सागर भिसे, सोनी भिसे आणि सुमित चिभडे याप्रकरणी जीपचालक अनिल दावण याच्याविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2010 08:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close