S M L

साध्वी प्रज्ञा सिंगची ब्रेन मॅपिंग टेस्ट पूर्ण

1 नोव्हेंबर, मुंबईमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या साध्वी प्रज्ञासिंग हिची ब्रेन मॅपिंग आणि लाय डिक्टेक्टर टेस्ट शुक्रवारी पार पडली. येत्या दोन दिवसांत साध्वीची नार्को टेस्ट घेण्यात येईल. त्यासाठी तिला मुंबईतल्या वाकोला इथल्या फॉरेन्सिक लॅब मध्ये नेण्यात येईल. इतर आरोपी शिवनारायण सिंग आणि श्याम साहू यांचीही काल नार्को टेस्ट झाली. बॉम्बस्फोट प्रकरणी आत्तापर्यंत एटीएसनं पाच लोकांना अटक केली असून त्यात एका माजी लष्करी अधिकार्‍याचाही समावेश आहे. 29 सप्टेंबरला मालेगावात स्फोट झाला होता. त्यावेळी स्फोटकात वापरण्यात आलेली बाईक साध्वी प्रज्ञा उर्फ पूर्णचेतनानंद हिची असल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर तिच्यासह इतर दोघांना अटक करण्यात आली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 1, 2008 10:44 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2008 10:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close