S M L

ऊसाला दोन हजार भाव द्या अन्यथा महिला मोर्चाचा इशारा

17 डिसेंबरऊसाचा दर ठरवतांना आंदोलक आणि कारखानदारांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवावा असं आवाहन कृषीमंत्री शरद पवारांनी केले आहे. तर दूसरीकडे ऊसाला पहिला हप्ता 2 हजार रूपये द्या नाही तर महिलांचा मोर्चा काढू असा इशारा पुणे जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी दिला. हा मोर्चा पालकमंत्री आणि प्रशासनाविरोधात काढून त्यांना बांगड्यांचा आहेर देणार असल्याचा इशाराही तावरे यांनी दिला. आज राज्य साखर संघाची बैठक आज पुण्यात होते. माळेगाव कारखान्यावर आंदोलन सुरूच असून येत्या दोन दिवसात निर्णय न झाल्यास या आंदोलनात महिलाही सहभागी होतील असा इशारा देण्यात आला. त्यामुळे हे आंदोलन अधिक पेटणार असच दिसत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2010 10:51 AM IST

ऊसाला दोन हजार भाव द्या अन्यथा महिला मोर्चाचा इशारा

17 डिसेंबर

ऊसाचा दर ठरवतांना आंदोलक आणि कारखानदारांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवावा असं आवाहन कृषीमंत्री शरद पवारांनी केले आहे. तर दूसरीकडे ऊसाला पहिला हप्ता 2 हजार रूपये द्या नाही तर महिलांचा मोर्चा काढू असा इशारा पुणे जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी दिला. हा मोर्चा पालकमंत्री आणि प्रशासनाविरोधात काढून त्यांना बांगड्यांचा आहेर देणार असल्याचा इशाराही तावरे यांनी दिला. आज राज्य साखर संघाची बैठक आज पुण्यात होते. माळेगाव कारखान्यावर आंदोलन सुरूच असून येत्या दोन दिवसात निर्णय न झाल्यास या आंदोलनात महिलाही सहभागी होतील असा इशारा देण्यात आला. त्यामुळे हे आंदोलन अधिक पेटणार असच दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2010 10:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close