S M L

महागाईचा शिरकाव विठूरायाच्या मंदिरात

17 डिसेंबरमहागाईचा फटका आता पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीलाही बसणार आहे. कारण मंदिर समितीने देवाच्या लिलावात दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे पैसे देवाची पूजा करणार्‍या बडव्यांच्या खिशातून जाणार असले तरी त्याची वसुली थेट भक्तांच्या खिशातूनच होणार आहे. विठूरायाच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक पंढरपूरात येत असतात. मात्र यापुढे या भाविकांना दर्शनासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. कारण मंदिर समितीने देवाच्या लिलावात दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला. रोजच्या पूजेतून मिळणार्‍या उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर आदल्या दिवशी मंदिर समितीकडून पूजेचा लिलाव लावला जातो. यापूर्वी हा लिलाव दिवसाला दहा हजार रुपये इतका होता तो यापुढे वीस हजार रुपये इतका आकारण्यात येणार आहे.याबद्दल बडव्यांच्या मनातही भाविकांप्रमाणेच नाराजी असून त्यामुळे बडवे आणि भाविकांमध्ये वितुष्ठ निर्माण होईल अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पंढरीचा विठोबा हा गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी आणि दिनदलितांचा दाता समजला जातो.महागाईने कंबरडे मोडलेल्या या समाजाला विठुच्या चरणी डोकं ठेवल्यानंतर जीवन कृतार्थ झाल्याचा आनंद मिळतो. आता तिथेही महागाईने शिरकाव केल्याने विठूचे दर्शनही महागल्याची प्रतिक्रिया व्यकत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2010 11:10 AM IST

महागाईचा शिरकाव विठूरायाच्या मंदिरात

17 डिसेंबर

महागाईचा फटका आता पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीलाही बसणार आहे. कारण मंदिर समितीने देवाच्या लिलावात दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे पैसे देवाची पूजा करणार्‍या बडव्यांच्या खिशातून जाणार असले तरी त्याची वसुली थेट भक्तांच्या खिशातूनच होणार आहे.

विठूरायाच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक पंढरपूरात येत असतात. मात्र यापुढे या भाविकांना दर्शनासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. कारण मंदिर समितीने देवाच्या लिलावात दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला. रोजच्या पूजेतून मिळणार्‍या उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर आदल्या दिवशी मंदिर समितीकडून पूजेचा लिलाव लावला जातो. यापूर्वी हा लिलाव दिवसाला दहा हजार रुपये इतका होता तो यापुढे वीस हजार रुपये इतका आकारण्यात येणार आहे.

याबद्दल बडव्यांच्या मनातही भाविकांप्रमाणेच नाराजी असून त्यामुळे बडवे आणि भाविकांमध्ये वितुष्ठ निर्माण होईल अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पंढरीचा विठोबा हा गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी आणि दिनदलितांचा दाता समजला जातो.महागाईने कंबरडे मोडलेल्या या समाजाला विठुच्या चरणी डोकं ठेवल्यानंतर जीवन कृतार्थ झाल्याचा आनंद मिळतो. आता तिथेही महागाईने शिरकाव केल्याने विठूचे दर्शनही महागल्याची प्रतिक्रिया व्यकत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2010 11:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close