S M L

सायना नेहवालने परत मिळवले दुसरे स्थान

17 डिसेंबरभारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने जागतिक बॅडमिंटन क्रमवारितलं आपलं नंबर दोनचं स्थान परत मिळवलं आहे. गुरूवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या जागतिक बॅडमिंटन रँकिंगमध्ये सायन नंबर दोनवर असल्याचे सांगितले. गेल्या आठवड्यात सायनाची रँकिंगमध्ये घसरण झाली होती. पण नुकत्याच झालेल्या हाँग काँग सुपर सीरिजमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे सायनाने नंबर दोनचे पद पून्हा मिळवलं आहे. पण येत्या 4 आठवड्यात सायना एकही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणार नाही. त्यामुळे तिच्या रॅकिंगमध्ये पून्हा घसरण होण्याची शक्यता आहे. चीनची झींग वँग आपलं पहिलं स्थान टिकवून आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2010 11:33 AM IST

सायना नेहवालने परत मिळवले दुसरे स्थान

17 डिसेंबर

भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने जागतिक बॅडमिंटन क्रमवारितलं आपलं नंबर दोनचं स्थान परत मिळवलं आहे. गुरूवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या जागतिक बॅडमिंटन रँकिंगमध्ये सायन नंबर दोनवर असल्याचे सांगितले. गेल्या आठवड्यात सायनाची रँकिंगमध्ये घसरण झाली होती. पण नुकत्याच झालेल्या हाँग काँग सुपर सीरिजमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे सायनाने नंबर दोनचे पद पून्हा मिळवलं आहे. पण येत्या 4 आठवड्यात सायना एकही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणार नाही. त्यामुळे तिच्या रॅकिंगमध्ये पून्हा घसरण होण्याची शक्यता आहे. चीनची झींग वँग आपलं पहिलं स्थान टिकवून आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2010 11:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close