S M L

कोकणातल्या 49 मायनिंग प्रकल्पांना पर्यावरण खात्याची स्थगिती

17 डिसेंबरकोकणातल्या खाण प्रकल्पावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकल्पांकडे पर्यावरण खात्याने लक्षं घातलं आहे. जिल्ह्यातल्या 49 मायनिंग प्रकल्पांना पर्यावरण खात्याने सध्या स्थगिती दिली. त्याबाबतच्या सूचना महाराष्ट्र सरकारला देण्यात आल्या आहे. समृध्द पश्चिम घाटाचा भाग असलेल्या कोकणात या मायनिंग प्रकल्पामुळे पर्यावरणाला धोका असल्याचे पर्यावरण तज्ञांचे मत आहे. या प्रकल्पांचा भार सहन करण्याची क्षमत कोकणात आहे का याचा सर्वांगिण अभ्यास करण्याची सूचनाही केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी महाराष्ट्र सरकारला केली होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2010 02:17 PM IST

कोकणातल्या 49 मायनिंग प्रकल्पांना पर्यावरण खात्याची स्थगिती

17 डिसेंबर

कोकणातल्या खाण प्रकल्पावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकल्पांकडे पर्यावरण खात्याने लक्षं घातलं आहे. जिल्ह्यातल्या 49 मायनिंग प्रकल्पांना पर्यावरण खात्याने सध्या स्थगिती दिली. त्याबाबतच्या सूचना महाराष्ट्र सरकारला देण्यात आल्या आहे. समृध्द पश्चिम घाटाचा भाग असलेल्या कोकणात या मायनिंग प्रकल्पामुळे पर्यावरणाला धोका असल्याचे पर्यावरण तज्ञांचे मत आहे. या प्रकल्पांचा भार सहन करण्याची क्षमत कोकणात आहे का याचा सर्वांगिण अभ्यास करण्याची सूचनाही केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी महाराष्ट्र सरकारला केली होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2010 02:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close