S M L

रेल्वेच्या ट्रॅक भरावाच्या खडीची चोरी

18 डिसेंबरकोकण रेल्वेच्या ट्रॅक भरावासाठी खडी साठवण्यात आली. पण या खडीची मोठ्या प्रमाणात चोरी करण्यात येते आहे. कोकण रेल्वे अधिकार्‍यांच्या संगनमताने हा प्रकार सुरु असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आरवली बोगद्याकडे जाणार्‍या रस्त्याजवळ असलेली ही खडी शिवसेनेच्या एका पदाधिका-याच्या सांगण्यावरून चोरून नेली जात असल्याचे आयबीएन लोकमतला आढळलं. याबाबत विचारणा केली असता रेल्वेच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी चौकशी करतो असं सांगून कॅमेर्‍यासमोर बोलण्यास नकार दिला. यावेळी डंपरमधून खडी उचलणार्‍यांशी आम्ही बोलायचा प्रयत्न केला तेव्हा आधी थातुर मातूर कारण देत, नंतर साहेबानीचं सांगितले अशी सारवासारव या वाहनचालकांनी केली. हे साहेब कोण ते मात्र काही सांगितलं जात नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 18, 2010 09:44 AM IST

रेल्वेच्या ट्रॅक भरावाच्या खडीची चोरी

18 डिसेंबर

कोकण रेल्वेच्या ट्रॅक भरावासाठी खडी साठवण्यात आली. पण या खडीची मोठ्या प्रमाणात चोरी करण्यात येते आहे. कोकण रेल्वे अधिकार्‍यांच्या संगनमताने हा प्रकार सुरु असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आरवली बोगद्याकडे जाणार्‍या रस्त्याजवळ असलेली ही खडी शिवसेनेच्या एका पदाधिका-याच्या सांगण्यावरून चोरून नेली जात असल्याचे आयबीएन लोकमतला आढळलं. याबाबत विचारणा केली असता रेल्वेच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी चौकशी करतो असं सांगून कॅमेर्‍यासमोर बोलण्यास नकार दिला.

यावेळी डंपरमधून खडी उचलणार्‍यांशी आम्ही बोलायचा प्रयत्न केला तेव्हा आधी थातुर मातूर कारण देत, नंतर साहेबानीचं सांगितले अशी सारवासारव या वाहनचालकांनी केली. हे साहेब कोण ते मात्र काही सांगितलं जात नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2010 09:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close