S M L

बीसीसीआय आणि आयपीएल टीमचा वाद मिटला

18 डिसेंबरआयपीएल सिझन 4 आता सुरळीत पार पडण्याची चिन्ह आहेत. बीसीसीआय आणि आयपीएल टीमदरम्यानचा वाद आता कोर्टात जाणार नाही असा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.त्यामुळे खेळाडूंचा लिलाव आणि मॅचेस ठरल्यानुसार होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. सिझन चारसाठी खेळाडूंचा लिलाव 8 आणि 9 जानेवारीला होणार आहे. तसेच या निर्णयामुळे सिझन 4 मध्ये 10 टीमसह 74 मॅचेस होणार आहेत. मुंबई हायकोर्टात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज इलेव्हन या दोन संघानी बीसीसीआयविरुद्ध याचिका दाखल केली होती. आयपीएलमधल्या गैरव्यवहार प्रकरणी बीसीसीआयने हे दोन्ही संघ रद्द केले होते पण अखेर मुंबई हायकोर्टाने या दोन्ही संघना सशर्त अटी घालुन बीसीसीआयच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. त्यामुळे बीसीसीआयसमोर सुप्रीम कोर्टात जाण्यावाचून पर्याय उपलब्ध नव्हता. शेवटी आयपीएलच्या मॅचेसवर आणि खेळाडूंच्या लिलावावर होणारा परिणाम लक्षात घेता बीसीसीआयने कोर्टात न जाण्याचा निर्णय घेतला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 18, 2010 11:33 AM IST

बीसीसीआय आणि आयपीएल टीमचा वाद मिटला

18 डिसेंबर

आयपीएल सिझन 4 आता सुरळीत पार पडण्याची चिन्ह आहेत. बीसीसीआय आणि आयपीएल टीमदरम्यानचा वाद आता कोर्टात जाणार नाही असा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

त्यामुळे खेळाडूंचा लिलाव आणि मॅचेस ठरल्यानुसार होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. सिझन चारसाठी खेळाडूंचा लिलाव 8 आणि 9 जानेवारीला होणार आहे. तसेच या निर्णयामुळे सिझन 4 मध्ये 10 टीमसह 74 मॅचेस होणार आहेत. मुंबई हायकोर्टात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज इलेव्हन या दोन संघानी बीसीसीआयविरुद्ध याचिका दाखल केली होती. आयपीएलमधल्या गैरव्यवहार प्रकरणी बीसीसीआयने हे दोन्ही संघ रद्द केले होते पण अखेर मुंबई हायकोर्टाने या दोन्ही संघना सशर्त अटी घालुन बीसीसीआयच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. त्यामुळे बीसीसीआयसमोर सुप्रीम कोर्टात जाण्यावाचून पर्याय उपलब्ध नव्हता. शेवटी आयपीएलच्या मॅचेसवर आणि खेळाडूंच्या लिलावावर होणारा परिणाम लक्षात घेता बीसीसीआयने कोर्टात न जाण्याचा निर्णय घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2010 11:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close