S M L

जैतापूरमध्ये अपघातानंतर तोडफोड ; पोलिसांना मारहाण

18 डिसेंबरजैतापूर मध्ये पोलीस सुमो आणि मोटरसायकल अपघातानंतर मोठा तणाव निर्माण झाला. या अपघातात मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाल्यामुळे जमाव संतप्त झाला. संतप्त जमावाने आत्तापर्यंत पोलिसांची एक व्हॅन पेटवून देऊन दुस-या व्हॅनची ही तोडफोड केली. तसेच आणखी पाच गाड्याही फोडण्यात आल्या आहे. दगडफेक करणा-या जमावाला शांत करण्यास गेलेल्या पोलिसांनाही जबर मारहाण झाली असून यात चार पोलीस गंभीर जखमी झाले. नाटे गावातल्या पोलीस स्टेशनमध्येही सुमारे दीड हजाराचा जमाव असून संतप्त महिला अणुउर्जा प्रकल्पाचा निषेध करत आहेत. जैतापूरकडे मोठा पोलीस बंदोबस्त रवाना करण्यात आला असून या जमावाला शांत राहण्याचे आवाहन शिवसेनेकेडून करण्यात येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 18, 2010 12:04 PM IST

जैतापूरमध्ये अपघातानंतर तोडफोड ; पोलिसांना मारहाण

18 डिसेंबर

जैतापूर मध्ये पोलीस सुमो आणि मोटरसायकल अपघातानंतर मोठा तणाव निर्माण झाला. या अपघातात मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाल्यामुळे जमाव संतप्त झाला. संतप्त जमावाने आत्तापर्यंत पोलिसांची एक व्हॅन पेटवून देऊन दुस-या व्हॅनची ही तोडफोड केली. तसेच आणखी पाच गाड्याही फोडण्यात आल्या आहे. दगडफेक करणा-या जमावाला शांत करण्यास गेलेल्या पोलिसांनाही जबर मारहाण झाली असून यात चार पोलीस गंभीर जखमी झाले. नाटे गावातल्या पोलीस स्टेशनमध्येही सुमारे दीड हजाराचा जमाव असून संतप्त महिला अणुउर्जा प्रकल्पाचा निषेध करत आहेत. जैतापूरकडे मोठा पोलीस बंदोबस्त रवाना करण्यात आला असून या जमावाला शांत राहण्याचे आवाहन शिवसेनेकेडून करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2010 12:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close