S M L

ऊसाच्या प्रश्नावर तोडगा ; विभागानुसार हप्ता

19 डिसेंबरपुण्यात आज ऊस प्रश्नावर झालेल्या बैठकीत अखेर तोडगा निघाला आहेत. पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या शेतकर्‍यांना 1800 रूपये पहिला हप्ता तर खान्देेश, मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकर्‍यांना 1750 रूपये पहिला हप्ता मिळणार असल्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी 21 तारखेपासून निघणार्‍या संघर्ष यात्रा स्थगित केल्याचे जाहीर केले आहेत. आणि महाराष्ट्रात सुरू असलेले ऊस आंदोलन मागे घेतल्याचंही स्पष्ट केले. पण शेतकर्‍यांना आता आठवडाभरात पैसे मिळतील याची दक्षता सरकारने घ्यावी असे गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलं आहे. ऊसाच्या प्रश्नावरुन राज्यभरात चालु असलेल्या आंदोलन आणि ऊसाच्या पहिल्या हप्ता या विषयांवर तोडगा काढण्यासाठी रविवारी पुण्यात एक बैठक पार पडली. पुण्याच्या साखर संकुलात ही बैठक सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बोलावली आहे. या बैठकीला साखर संघ आणि आंदोलनकर्त्यांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होत आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्यासह गोपीनाथ मुंडे, राजू शेट्टी, रघूनाथदादा पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील आदी नेते या बैठकीला उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 19, 2010 04:28 PM IST

ऊसाच्या प्रश्नावर तोडगा ; विभागानुसार हप्ता

19 डिसेंबर

पुण्यात आज ऊस प्रश्नावर झालेल्या बैठकीत अखेर तोडगा निघाला आहेत. पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या शेतकर्‍यांना 1800 रूपये पहिला हप्ता तर खान्देेश, मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकर्‍यांना 1750 रूपये पहिला हप्ता मिळणार असल्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी 21 तारखेपासून निघणार्‍या संघर्ष यात्रा स्थगित केल्याचे जाहीर केले आहेत. आणि महाराष्ट्रात सुरू असलेले ऊस आंदोलन मागे घेतल्याचंही स्पष्ट केले. पण शेतकर्‍यांना आता आठवडाभरात पैसे मिळतील याची दक्षता सरकारने घ्यावी असे गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलं आहे.

ऊसाच्या प्रश्नावरुन राज्यभरात चालु असलेल्या आंदोलन आणि ऊसाच्या पहिल्या हप्ता या विषयांवर तोडगा काढण्यासाठी रविवारी पुण्यात एक बैठक पार पडली. पुण्याच्या साखर संकुलात ही बैठक सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बोलावली आहे. या बैठकीला साखर संघ आणि आंदोलनकर्त्यांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होत आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्यासह गोपीनाथ मुंडे, राजू शेट्टी, रघूनाथदादा पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील आदी नेते या बैठकीला उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 19, 2010 04:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close