S M L

सांगलीत बंद दुचाकी ढकल गाडीचं आंदोलन

19 डिसेंबरसांगलीत आज एक अनोख आंदोलन करण्यात आलं. इंधन दरवाढी विरोधात भाजपच्या युवा मोर्चाच्यावतीने बंद दुचाकी ढकल गाडीचं आंदोलन केले गेले. इंधन दरवाढीमुळे सामान्य वर्गाचे वाहतुकीचे साधन असणारी दुचाकी चालवणे आता लोकांना कठीण झालं म्हणून गाड्या ढकलण्याच्या हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.केंद्र सरकार नुकत्याच केलेल्या महागाई दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणं मुश्किल झालं आहे. त्यातच या वर्षभरामध्ये तिसर्‍यांदा इंधन दरवाढ करुन केंद्र सरकारने आगीत तेल ओतण्याचे काम केलं आहे. या सर्व गोष्टीमुळे महागाईचा भडका उडाला आहे. या सर्व गोष्टीमुळे आम आदमीच कंबरड मोडून गेलं आहे. याच्या निषेधार्तच भाजपाचा सुवा मोर्चा सांगली यांच्या वतीने दुचाकी बंद ढकल गाडीचे आयोजन करुन एक अनोख आंदोलन छेडण्यात आलं. काँग्रेस का हात आम आदमीके नाम असा नारा देऊन सत्तेवर आलेल्या युपीए सरकारने सातत्याने होणार्‍या इंधन दरवाढीमुळे लोकांच जगणं मुश्किल करुन टाकलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 19, 2010 12:43 PM IST

सांगलीत बंद दुचाकी ढकल गाडीचं आंदोलन

19 डिसेंबरसांगलीत आज एक अनोख आंदोलन करण्यात आलं. इंधन दरवाढी विरोधात भाजपच्या युवा मोर्चाच्यावतीने बंद दुचाकी ढकल गाडीचं आंदोलन केले गेले. इंधन दरवाढीमुळे सामान्य वर्गाचे वाहतुकीचे साधन असणारी दुचाकी चालवणे आता लोकांना कठीण झालं म्हणून गाड्या ढकलण्याच्या हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

केंद्र सरकार नुकत्याच केलेल्या महागाई दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणं मुश्किल झालं आहे. त्यातच या वर्षभरामध्ये तिसर्‍यांदा इंधन दरवाढ करुन केंद्र सरकारने आगीत तेल ओतण्याचे काम केलं आहे. या सर्व गोष्टीमुळे महागाईचा भडका उडाला आहे. या सर्व गोष्टीमुळे आम आदमीच कंबरड मोडून गेलं आहे. याच्या निषेधार्तच भाजपाचा सुवा मोर्चा सांगली यांच्या वतीने दुचाकी बंद ढकल गाडीचे आयोजन करुन एक अनोख आंदोलन छेडण्यात आलं. काँग्रेस का हात आम आदमीके नाम असा नारा देऊन सत्तेवर आलेल्या युपीए सरकारने सातत्याने होणार्‍या इंधन दरवाढीमुळे लोकांच जगणं मुश्किल करुन टाकलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 19, 2010 12:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close