S M L

सचिन लढला पण भारत हरला

20 डिसेंबरसेंच्युरिअन टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला आहे. ही मॅच वाचवण्यासाठी सचिनची झुंज मात्र अपयशी ठरली. दक्षिण आफ्रिकाने भारताला 25 धावानी पराभव केला. सचिन 111 धावांवर नाबाद राहिला आहे. खेळाच्या पाचव्या दिवशी भारतीय खेळाडू एका पाठोपाठ बाद झाले आणि भारताचा 25 धावांनी पराभव झाला.भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सेंच्युरीअनमध्ये झालेली पहिली टेस्ट मॅच अखेर आफ्रिकन टीमने एक इनिंग आणि 25 रननी जिंकली. कालच्या आठ विकेटवर 454 रन्सच्या स्कोअरवर भारताने आपली दुसरी इनिंग आज पुढे सुरु केली. पण श्रीसंत आणि उनाडकट यांनी जेमतेम 34 बॉल तग धरला. श्रीसंत 3 रनवर तर उनाडकट एक रन करुन आऊट झाले. दुसर्‍या बाजूने सचिन तेंडुलकर 111 रनवर नॉटआऊट राहिला. टेस्टच्या दुसर्‍या इनिंगमध्ये भारतीय टीमने चांगली टक्कर दिली. सचिनने रेकॉर्डब्रेक पन्नासावी टेस्ट सेंच्युरी केली तर धोणीनेही 90 रन्स केले. पण 484 रन्सची पिछाडी भारतीय टीम भरुन काढू शकली नाही. आणि टीमला इनिंगने पराभव स्विकारावा लागला. सीरिजमध्ये आता दक्षिण आफ्रिकेने 1-0ने आघाडी घेतलीय. पुढची टेस्ट 26 डिसेंबरपासून दरबानला सुरु होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 20, 2010 09:33 AM IST

सचिन लढला पण भारत हरला

20 डिसेंबर

सेंच्युरिअन टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला आहे. ही मॅच वाचवण्यासाठी सचिनची झुंज मात्र अपयशी ठरली. दक्षिण आफ्रिकाने भारताला 25 धावानी पराभव केला. सचिन 111 धावांवर नाबाद राहिला आहे. खेळाच्या पाचव्या दिवशी भारतीय खेळाडू एका पाठोपाठ बाद झाले आणि भारताचा 25 धावांनी पराभव झाला.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सेंच्युरीअनमध्ये झालेली पहिली टेस्ट मॅच अखेर आफ्रिकन टीमने एक इनिंग आणि 25 रननी जिंकली. कालच्या आठ विकेटवर 454 रन्सच्या स्कोअरवर भारताने आपली दुसरी इनिंग आज पुढे सुरु केली. पण श्रीसंत आणि उनाडकट यांनी जेमतेम 34 बॉल तग धरला. श्रीसंत 3 रनवर तर उनाडकट एक रन करुन आऊट झाले. दुसर्‍या बाजूने सचिन तेंडुलकर 111 रनवर नॉटआऊट राहिला. टेस्टच्या दुसर्‍या इनिंगमध्ये भारतीय टीमने चांगली टक्कर दिली. सचिनने रेकॉर्डब्रेक पन्नासावी टेस्ट सेंच्युरी केली तर धोणीनेही 90 रन्स केले. पण 484 रन्सची पिछाडी भारतीय टीम भरुन काढू शकली नाही. आणि टीमला इनिंगने पराभव स्विकारावा लागला. सीरिजमध्ये आता दक्षिण आफ्रिकेने 1-0ने आघाडी घेतलीय. पुढची टेस्ट 26 डिसेंबरपासून दरबानला सुरु होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2010 09:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close