S M L

सर्वसाधारण सभेत भिशीचा खेळ !

20 डिसेंबरऔरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज एक विदारक चित्र पाहायला मिळाले. एकीकडे नगरसेवकांचा गोंधळ आणि दुसरीकडे महिला नगरसेवकांचा पैशांचा खेळ असं हे दृश्य होतं.महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकीकडे खंडणीच्या प्रकरणात अडकलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यासाठी आग्रह धरला जात होता. अधिकार्‍यांवर कारवाई होईपर्यंत सभागृह चालू देणार नाही अशी भूमिका नगरसेवकांनी घेतल्याने एकच गोंधळ उडाला. तर दुसरीकडे महिला नगरसेविका चक्क भिशीचा खेळ खेळत बसल्या होत्या. सभागृहात चिठ्‌ठ्या लिहण्यात आत्यात आणि या चिठ्ठया लिहून एकमेकींना दिल्या जात होत्या. त्यावर लिहलेले आकडे पाहून काहींनी त्या चुरगाळून फेकल्या देखील. आणि आणखी एक धक्कादायक बाब ती अशी की सभागृहातच चक्क पैशांचे वाटप सुरू करण्यात आले. एकमेकांना पैसे वाटले ही गेले. या सर्व प्रकारबद्दल मात्र अधिकारी निश्चिंत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 20, 2010 12:43 PM IST

सर्वसाधारण सभेत भिशीचा  खेळ !

20 डिसेंबर

औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज एक विदारक चित्र पाहायला मिळाले. एकीकडे नगरसेवकांचा गोंधळ आणि दुसरीकडे महिला नगरसेवकांचा पैशांचा खेळ असं हे दृश्य होतं.

महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकीकडे खंडणीच्या प्रकरणात अडकलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यासाठी आग्रह धरला जात होता. अधिकार्‍यांवर कारवाई होईपर्यंत सभागृह चालू देणार नाही अशी भूमिका नगरसेवकांनी घेतल्याने एकच गोंधळ उडाला. तर दुसरीकडे महिला नगरसेविका चक्क भिशीचा खेळ खेळत बसल्या होत्या. सभागृहात चिठ्‌ठ्या लिहण्यात आत्यात आणि या चिठ्ठया लिहून एकमेकींना दिल्या जात होत्या. त्यावर लिहलेले आकडे पाहून काहींनी त्या चुरगाळून फेकल्या देखील. आणि आणखी एक धक्कादायक बाब ती अशी की सभागृहातच चक्क पैशांचे वाटप सुरू करण्यात आले. एकमेकांना पैसे वाटले ही गेले. या सर्व प्रकारबद्दल मात्र अधिकारी निश्चिंत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2010 12:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close