S M L

गोंदियात अदानी समुहाकडून बेसुमार वृक्षतोड

गोपाल मोटघरे, गोंदिया 20 डिसेंबरऊर्जा प्रकल्प उभारताना एकही झाडाची कत्तल होणार नाही अशी हमी अदानी ग्रुपने दिली होती आणि त्याच अटीवर त्यांना पर्यावरण आणि वन विभागाकडून एनओसी देण्यात आली. पण अदानी पॉवर प्रोजेक्ट उभारत असताना वन विभागाच्या जागेत मोठ्या प्रमाणावर बांधकाम आणि खोदकाम करून अदानी समूहाने पर्यावरण आणि वन विभागाच्या नियमांची पायमल्ली केलेली आहे. तिरोडा प्रकल्प उभारण्यापूर्वी पर्यावरणाची हानी होणार नाही असा दावा अदानी ग्रुपने केला होता. त्याचबरोबर अदानी पॉवर प्रोजेक्ट हा पूर्णपणे इको फ्रेन्डली असेल असंही त्यांनी म्हटलं होते. पण त्यांचा हा दावा पूर्ण पणे फोल ठरला आहे. अदानी पावर प्रोजेक्टच्या मागच्या बाजू पासून 7 किलो मिटर अंतरावर नागझिरा राष्ट्रीय अभयारण्याला सुरुवात होते. तसेच अदानी पावर प्रोजेक्टच्या मागच्या बाजूला मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल आहे. नागझिरा राष्ट्रीय अभयारण्याजवळ असल्यामुळे नागझिरा अभयारण्यातील काही प्रणी अदानी पावर प्रोजेक्टच्या मागच्या परिसरात असलेल्या झुडपी जंगलातून अधून मधून फिरत असतात. मात्र या झुडपी जंगलात अदानी समुहाकडून मोठ्याप्रमाणात खोदकाम आणि बांधकाम करण्यात आल आहे. त्यामुळे या परिसरातील वन प्राणी विस्तपित होत असून मोठ्या प्रमाणात वृक्षाची कत्तल अदानी समुहाकडून करण्यात आली आहे.वन विभागाकडून अदानी समूहाला एक एकर ही जागा देण्यात आली नाही. तसेच वन विभागाच्या जागेवर अवैध खोदकाम किंवा बांधकाम करण्याची परवानगीसुद्धा कुणालाही मिळात नाही. मात्र अदानी पावर प्रोजेक्टला जागा अपुरी पडत असल्याने अदानी समुहाने चक्क वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून जवळपास 32 हेक्टर जागेवर खोदकाम केला आहे. हा सगळा खोदकाम एकाच दिवसी करण्यात आला नाही तर खोदकाम जवळपास पाच - सहा महिने सुरु होता. मात्र वन विभगाकडून अदानी समुहाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात आला. पण जेव्हा लोकांच्या लक्षात आलं की अदानी समुहाने वन विभागाच्या जागेवर अवैध खोदकाम आणि बांधकाम करण्यात आलं. तेव्हा आम्ही कारवाई केली आहे दाखविण्याकरिता अदानी समुहाकडून चार लाख 97000 दंड आकारण्यात आला.अदानी पावन प्रजेक्टकडून वन विभगाच्या जागेवर खोदकाम आणि बांधकाम तर केलाच सोबत वन विभागाची परवानगी न घेता झुडपी जंगलात ठिकठिकाणी हात पंप खोदण्यात आले आहे. एवढ मोठ खोदकाम नाणी बांधकाम होत असताना वन विभागाचे कर्मचारी कुठं झोपले होते का असा प्रश्न आज सर्व सामान्य लोकाना पडला आहे. अदानी समुहाकडे वन विभाग मुद्दाम बघ्याची भूमिका घेत आहे. तसेच गोंदिया जिल्ह्यतील एका मोठ्या नेत्याच्या वर्धहस्तामुळे अदानी समुहावर अधिकारी कारवाई कारवाई करायला मागेपुढे पाहत आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या वनाचा वाली सध्यातरी कुणी नाही आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 20, 2010 01:06 PM IST

गोंदियात अदानी समुहाकडून बेसुमार वृक्षतोड

गोपाल मोटघरे, गोंदिया

20 डिसेंबर

ऊर्जा प्रकल्प उभारताना एकही झाडाची कत्तल होणार नाही अशी हमी अदानी ग्रुपने दिली होती आणि त्याच अटीवर त्यांना पर्यावरण आणि वन विभागाकडून एनओसी देण्यात आली. पण अदानी पॉवर प्रोजेक्ट उभारत असताना वन विभागाच्या जागेत मोठ्या प्रमाणावर बांधकाम आणि खोदकाम करून अदानी समूहाने पर्यावरण आणि वन विभागाच्या नियमांची पायमल्ली केलेली आहे. तिरोडा प्रकल्प उभारण्यापूर्वी पर्यावरणाची हानी होणार नाही असा दावा अदानी ग्रुपने केला होता. त्याचबरोबर अदानी पॉवर प्रोजेक्ट हा पूर्णपणे इको फ्रेन्डली असेल असंही त्यांनी म्हटलं होते. पण त्यांचा हा दावा पूर्ण पणे फोल ठरला आहे.

अदानी पावर प्रोजेक्टच्या मागच्या बाजू पासून 7 किलो मिटर अंतरावर नागझिरा राष्ट्रीय अभयारण्याला सुरुवात होते. तसेच अदानी पावर प्रोजेक्टच्या मागच्या बाजूला मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल आहे. नागझिरा राष्ट्रीय अभयारण्याजवळ असल्यामुळे नागझिरा अभयारण्यातील काही प्रणी अदानी पावर प्रोजेक्टच्या मागच्या परिसरात असलेल्या झुडपी जंगलातून अधून मधून फिरत असतात. मात्र या झुडपी जंगलात अदानी समुहाकडून मोठ्याप्रमाणात खोदकाम आणि बांधकाम करण्यात आल आहे. त्यामुळे या परिसरातील वन प्राणी विस्तपित होत असून मोठ्या प्रमाणात वृक्षाची कत्तल अदानी समुहाकडून करण्यात आली आहे.वन विभागाकडून अदानी समूहाला एक एकर ही जागा देण्यात आली नाही. तसेच वन विभागाच्या जागेवर अवैध खोदकाम किंवा बांधकाम करण्याची परवानगीसुद्धा कुणालाही मिळात नाही. मात्र अदानी पावर प्रोजेक्टला जागा अपुरी पडत असल्याने अदानी समुहाने चक्क वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून जवळपास 32 हेक्टर जागेवर खोदकाम केला आहे. हा सगळा खोदकाम एकाच दिवसी करण्यात आला नाही तर खोदकाम जवळपास पाच - सहा महिने सुरु होता. मात्र वन विभगाकडून अदानी समुहाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात आला. पण जेव्हा लोकांच्या लक्षात आलं की अदानी समुहाने वन विभागाच्या जागेवर अवैध खोदकाम आणि बांधकाम करण्यात आलं. तेव्हा आम्ही कारवाई केली आहे दाखविण्याकरिता अदानी समुहाकडून चार लाख 97000 दंड आकारण्यात आला.

अदानी पावन प्रजेक्टकडून वन विभगाच्या जागेवर खोदकाम आणि बांधकाम तर केलाच सोबत वन विभागाची परवानगी न घेता झुडपी जंगलात ठिकठिकाणी हात पंप खोदण्यात आले आहे. एवढ मोठ खोदकाम नाणी बांधकाम होत असताना वन विभागाचे कर्मचारी कुठं झोपले होते का असा प्रश्न आज सर्व सामान्य लोकाना पडला आहे. अदानी समुहाकडे वन विभाग मुद्दाम बघ्याची भूमिका घेत आहे. तसेच गोंदिया जिल्ह्यतील एका मोठ्या नेत्याच्या वर्धहस्तामुळे अदानी समुहावर अधिकारी कारवाई कारवाई करायला मागेपुढे पाहत आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या वनाचा वाली सध्यातरी कुणी नाही आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2010 01:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close