S M L

छातीत बांबू आरपार गेलेल्या तरुणाला जीवदान

20 डिसेंबरएका विचीत्र अपघातात छातीत बांबू आरपार गेलेल्या 17 वर्षाच्या तरुणाला सांगलीच्या डॉक्टरांनी अथक प्रयत्न करुन वाचवलं. सांगली जिल्ह्यातील पलूसच्या मदरस्यात शिकणारा़ 17 वर्षीय इलियास जमादार. इलियास मूळचा जतचा. बकरी ईद साठी गावी जात असताना तो जात असलेल्या गाडीला अपघात झाला. हा अपघात असा विचित्र होता की इलियासच्या छातीतून एक बांबू अक्षरशः आरपार गेला. यात इलियासचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्याचबरोबर त्याच्या बरगड्याही फ्रॅक्चर झाल्या होत्या मेंदूला रक्त पुरवठा करणारी नसही तुटली होती. मात्र, सलग सात तासांच्या डॉक्टरांच्या अथक प्रर्यत्नांनी इलियासला जीवदान मिळालं.मृत्यूशी झुंज देणारा इलियास या अपघातातून बरा होईल की नाही याची खात्री नसलेल्या त्याच्या कुटुंबियांना तर हा आनंद शब्दातही व्यक्त करता येत नाही. दैव बलवत्तर असलं की माणसावर ओढवलेला कुठलाही विचित्र प्रसंग कसा निभावून जाऊ शकतो हेच इलियासवर ओढवलेल्या प्रसंगातून सगळ्यांना अनुभवायला आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 20, 2010 08:21 AM IST

छातीत बांबू आरपार गेलेल्या तरुणाला जीवदान

20 डिसेंबर

एका विचीत्र अपघातात छातीत बांबू आरपार गेलेल्या 17 वर्षाच्या तरुणाला सांगलीच्या डॉक्टरांनी अथक प्रयत्न करुन वाचवलं. सांगली जिल्ह्यातील पलूसच्या मदरस्यात शिकणारा़ 17 वर्षीय इलियास जमादार. इलियास मूळचा जतचा. बकरी ईद साठी गावी जात असताना तो जात असलेल्या गाडीला अपघात झाला. हा अपघात असा विचित्र होता की इलियासच्या छातीतून एक बांबू अक्षरशः आरपार गेला. यात इलियासचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्याचबरोबर त्याच्या बरगड्याही फ्रॅक्चर झाल्या होत्या मेंदूला रक्त पुरवठा करणारी नसही तुटली होती. मात्र, सलग सात तासांच्या डॉक्टरांच्या अथक प्रर्यत्नांनी इलियासला जीवदान मिळालं.मृत्यूशी झुंज देणारा इलियास या अपघातातून बरा होईल की नाही याची खात्री नसलेल्या त्याच्या कुटुंबियांना तर हा आनंद शब्दातही व्यक्त करता येत नाही. दैव बलवत्तर असलं की माणसावर ओढवलेला कुठलाही विचित्र प्रसंग कसा निभावून जाऊ शकतो हेच इलियासवर ओढवलेल्या प्रसंगातून सगळ्यांना अनुभवायला आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2010 08:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close