S M L

लवासा प्रकरणात शरद पवारांचे आर्थिक हितसंबंध - मेधा पाटकर

21 डिसेंबरलवासा प्रकरणात शरद पवारांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत. हा प्रकल्प वादात सापडल्यानंतर त्यांचे नातेवाईक आणि निकटवर्तीयांनी दोन हजार कोटींचे शेअर्स विकलेले आहेत. असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केला आहे. तसेच प्रकल्प छोटा की मोठा हे बघण्यापेक्षा प्रकल्पातील नेत्यांचा पैसा छोटा की मोठा हे तपासण्याची गरज आहे असे सडेतोड प्रत्युत्तर जनआंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी शरद पवार यांना औरंगाबाद येथे दिलं. महाराष्ट्रातील मोठ्या प्रकल्पांना एनजीओ, सामाजिक कार्यकर्त्या आणि मीडियाचा विरोध होत असल्याबद्दल पवारांनी केलेल्या विधानावर पाटकर यांनी ही प्रतिक्रिया नोंदविली. या प्रकल्पाचे अनधिकृत बांधकाम पाडल्याखेरीज अन्य कोणताही मार्ग नाही असंही त्यांनी ठासून सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 21, 2010 02:08 PM IST

लवासा प्रकरणात शरद पवारांचे आर्थिक हितसंबंध - मेधा पाटकर

21 डिसेंबर

लवासा प्रकरणात शरद पवारांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत. हा प्रकल्प वादात सापडल्यानंतर त्यांचे नातेवाईक आणि निकटवर्तीयांनी दोन हजार कोटींचे शेअर्स विकलेले आहेत. असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केला आहे. तसेच प्रकल्प छोटा की मोठा हे बघण्यापेक्षा प्रकल्पातील नेत्यांचा पैसा छोटा की मोठा हे तपासण्याची गरज आहे असे सडेतोड प्रत्युत्तर जनआंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी शरद पवार यांना औरंगाबाद येथे दिलं. महाराष्ट्रातील मोठ्या प्रकल्पांना एनजीओ, सामाजिक कार्यकर्त्या आणि मीडियाचा विरोध होत असल्याबद्दल पवारांनी केलेल्या विधानावर पाटकर यांनी ही प्रतिक्रिया नोंदविली. या प्रकल्पाचे अनधिकृत बांधकाम पाडल्याखेरीज अन्य कोणताही मार्ग नाही असंही त्यांनी ठासून सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2010 02:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close