S M L

पुण्यात कुस्तीपटू अमोल बुचडेचं जल्लोषात स्वागत

21 डिसेंबरपुण्याचा कुस्तीपटू अमोल बुचडेने रुस्तम-ए-हिंदचा किताब पटकावत महाराष्ट्राला बहुमान मिळवून दिला. पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या स्पर्धेत अमोलने भरीव कामगिरी करत हा खिताब पटकावला. अशी कामगिरी करणारा तो महाराष्ट्रचा तिसरा तर पुण्यातला पहिलाच कुस्तीपटू ठरला. या विजयी कामगिरीनंतर अमोल आज सकाळी पुण्यात दाखल झाला. यावेळी पुणेकरांनी त्याचे जल्लोषात स्वागत करत भव्य मिरवणुकही काढली.यानंतर अमोलने पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेत पुणेकरांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभारही मानले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 21, 2010 03:03 PM IST

पुण्यात कुस्तीपटू अमोल बुचडेचं जल्लोषात स्वागत

21 डिसेंबर

पुण्याचा कुस्तीपटू अमोल बुचडेने रुस्तम-ए-हिंदचा किताब पटकावत महाराष्ट्राला बहुमान मिळवून दिला. पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या स्पर्धेत अमोलने भरीव कामगिरी करत हा खिताब पटकावला. अशी कामगिरी करणारा तो महाराष्ट्रचा तिसरा तर पुण्यातला पहिलाच कुस्तीपटू ठरला. या विजयी कामगिरीनंतर अमोल आज सकाळी पुण्यात दाखल झाला. यावेळी पुणेकरांनी त्याचे जल्लोषात स्वागत करत भव्य मिरवणुकही काढली.यानंतर अमोलने पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेत पुणेकरांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभारही मानले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2010 03:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close