S M L

कलमाडी आणि भानोत यांना हटवता येणार नाही !

21 डिसेंबरसुरेश कलमाडी आणि त्यांचे सहकारी ललित भानोत यांना कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजन समितीवरून हटवता येणार नाही असं केंद्र सरकारने स्पष्ट केले. सीबीआयच्या मागणीला केंद्राने तसं उत्तर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. आयोजन समितीचे अध्यक्ष कलमाडी आणि भानोत हे सीबीआयच्या तपासात अडथळे आणत आहेत. त्यामुळे त्यांना पदावरून काढून टाकावे अशी मागणी सीबीआयने केली होती. तसं पत्र सीबीआयच्या संचालकांनी कॅबिनेट सचिवांना लिहिले होते. पण कॉमनवेल्थ गेम्स आयोजन समिती ही स्वायत्त संस्था आहे त्यामुळे या दोघांना हटवता येणार नाही असं उत्तर केंद्राने सीबीआयच्या विंनतीला दिली. कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने भानोत यांची चौकशी केली. पण अजून त्यांनी कलमाडींची मात्र चौकशी केली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 21, 2010 05:40 PM IST

कलमाडी आणि भानोत यांना हटवता येणार नाही !

21 डिसेंबर

सुरेश कलमाडी आणि त्यांचे सहकारी ललित भानोत यांना कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजन समितीवरून हटवता येणार नाही असं केंद्र सरकारने स्पष्ट केले. सीबीआयच्या मागणीला केंद्राने तसं उत्तर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. आयोजन समितीचे अध्यक्ष कलमाडी आणि भानोत हे सीबीआयच्या तपासात अडथळे आणत आहेत. त्यामुळे त्यांना पदावरून काढून टाकावे अशी मागणी सीबीआयने केली होती. तसं पत्र सीबीआयच्या संचालकांनी कॅबिनेट सचिवांना लिहिले होते. पण कॉमनवेल्थ गेम्स आयोजन समिती ही स्वायत्त संस्था आहे त्यामुळे या दोघांना हटवता येणार नाही असं उत्तर केंद्राने सीबीआयच्या विंनतीला दिली. कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने भानोत यांची चौकशी केली. पण अजून त्यांनी कलमाडींची मात्र चौकशी केली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2010 05:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close