S M L

शेतकर्‍यांची जमिन लाटणार्‍या बिल्डरावर गुन्हा दाखल

22 डिसेंबरबनावट कागदपत्रांच्या जोरावर 14 शेतकर्‍यांची जमिन लाटलेल्या बिल्डर आणि तलाठ्याविरोधात कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पण अजून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आरोपींना त्वरीत अटक करण्याची मागणी करत पोलीस स्टेशनसमोरच उपोषणाला बसण्याचा इशारा जमिनीच्या मुळ मालकाने दिला आहे. कोंढवा परिसरातली 14 एकर जमीन 1982 मध्ये परिसरातील 61 शेतकर्‍यांनी विकत घेतली होती. या जमीनीच्या सात बारावर 1994 पर्यंत जमीन मालकांची नावसुध्दा होती. पण 1994 नंतर या जमीनीच्या सात बार्‍यावर 'बेव्हर्ली हिल्स' या कंपनीचे नाव लागले. ही बाब जमीन मालकांच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी पोलीसात तक्रार दाखल केली. परंतु पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे त्यांनी हाय कोर्टात धाव घेतली.शेवटी पोलिसांनी या बांधकाम व्यावसाइकांवर आणि त्यांना मदत करणार्‍या तलाठ्याविरोधात गुन्हा दाखल केला. परंतु अजूनही त्यांना अटक करण्यात आली नाही. त्यामुळे या जमीन मालकांनी कोंढवा पोलीस स्टेशन समोर उपोषनाला बसण्याचा निर्णय घेतला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 22, 2010 01:34 PM IST

शेतकर्‍यांची जमिन लाटणार्‍या बिल्डरावर गुन्हा दाखल

22 डिसेंबर

बनावट कागदपत्रांच्या जोरावर 14 शेतकर्‍यांची जमिन लाटलेल्या बिल्डर आणि तलाठ्याविरोधात कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पण अजून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आरोपींना त्वरीत अटक करण्याची मागणी करत पोलीस स्टेशनसमोरच उपोषणाला बसण्याचा इशारा जमिनीच्या मुळ मालकाने दिला आहे.

कोंढवा परिसरातली 14 एकर जमीन 1982 मध्ये परिसरातील 61 शेतकर्‍यांनी विकत घेतली होती. या जमीनीच्या सात बारावर 1994 पर्यंत जमीन मालकांची नावसुध्दा होती. पण 1994 नंतर या जमीनीच्या सात बार्‍यावर 'बेव्हर्ली हिल्स' या कंपनीचे नाव लागले. ही बाब जमीन मालकांच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी पोलीसात तक्रार दाखल केली. परंतु पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे त्यांनी हाय कोर्टात धाव घेतली.

शेवटी पोलिसांनी या बांधकाम व्यावसाइकांवर आणि त्यांना मदत करणार्‍या तलाठ्याविरोधात गुन्हा दाखल केला. परंतु अजूनही त्यांना अटक करण्यात आली नाही. त्यामुळे या जमीन मालकांनी कोंढवा पोलीस स्टेशन समोर उपोषनाला बसण्याचा निर्णय घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 22, 2010 01:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close