S M L

कलाकारांमध्ये रंगले गॉसिपचे किस्से

1 नोव्हेंबर मुंबई -अमृता पांजास्टार्स म्हटलं की गॉसिप्स आलंच. मीडियात लाईम लाईट मध्ये राहताना त्यांना या गॉसिप्सपासून नेहमीच सावध रहावं लागतं. अशाच काही स्टार्सनी त्यांच्याशी संबंधित गॉसिप्सवर 'आयबीएन लोकमत'कडे प्रतिक्रिया व्यक्त केल्या .स्टार्स जिथे जिथे जातात तिथे गॉसिप्स एखाद्या भुंग्यासारखा त्यांच्या मागे पिछा पुरवत असतात. याच अफवा त्यांच्या प्रसिध्दीसाठी ओव्हर टाईम करत असतात असं म्हणायलाही हरकत नाही. सामान्य लोकांनाही या स्टार गॉसिप ऐकल्याशिवाय नवा दिवस उगवल्यासारखं वाटत नाही, आणि आपले स्टार्सही या अफवा लक्षपूर्वक ऐकायला विसरत नाहीत.अभिनेत्री सोनम कपूर म्हणते की 'ती एका वेळी दोघांबरोबर डेटींग करत आहे. हे शाळकरी मुलांसारखं आहे. फक्त कपूर हे आडनाव आहे, म्हणून त्या दोघांना तिने जवळ केलं आहे.' ईशा कोप्पीकरला अभिषेक बच्चन बरोबर डेटींग करायचं आहे. पण ती यात काहीच तथ्य नसल्याचं सांगत आहे. पण अभिषेकच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. तो सांगतो 'एश्वर्या मांगलिक आहे आणि मी तिची शांती करून घेतली होती असं लोक समजतात. पण तिला मांगळ नाही.सनी देओल आणि तुषार कपूर यांच्या खाजगी आयुष्यापासून गॉसिप्स लांब असलं तरी त्यांच्या प्रोफेशनल लाईफवर मात्र गरमागरम खायाली पुलाव पकवले जात आहेत. त्यावर तुषार कपूर सांगतो, ‘मी एका रिअ‍ॅलिटी शोच्या वेळेला सेटवर चक्कर येऊन पडलो असं त्या सेटवरचे लोक म्हणतात. पण मी त्यावेळी फ क्त अस्वस्थ झालो होतो. उगाचंच कशी काय चक्कर येईल ?' सनी म्हणाला, 'मी शुटच्या ठिकाणी उशीरा पोहोचतो, अशा वावड्या आहेत. पण मी तर रोज सकाळी सातलाच उठतो,' असं सांगत त्याने ते बोलणं हसण्यावारी नेलं. तर अभिनेत्री कंगना रानावतने स्पष्ट शब्दात सांगितलं की, 'माझं कोणत्याच दिग्दर्शकाबरोबर काही नाही. त्यामुळे प्लीज अश्या अफवा पसरवू नका.' एकूणच कलाकार हे गॉसिप आपले एन्जॉय करताना दिसतात.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 1, 2008 01:08 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2008 01:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close