S M L

जेपीसीबाबत विरोधकांची तयारी असेल तर विशेष सत्र बोलावू - प्रणव मुखर्जी

22 डिसेंबरसंसदेचे विशेष अधिवेशन घेण्याची तयारी सरकारनं दाखवली. जेपीसी चौकशीच्या मुद्द्यावर चर्चा करायची विरोधकांची तयारी असेल तर आम्ही विशेष सत्र बोलावू असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दिलं. तसेच नव्या नेतृत्वाला वाव देण्यासाठी आपल्याला निवृत्त व्हायचे आहे असंही त्यांंनी म्हटले. दिल्लीत सुरु असलेल्या सीएनएन आयबीएनच्या इंडीयन ऑफ द ईयर अवार्ड 2010 वितरण सोहळयात ते बोलत होते. या विशेष सोहळ्यात क्रीडा,राजकारण, समाज सेवा क्षेत्र, उद्योग आणि मनोरंजन या विविध क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करणार्‍या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. यावर्षीचे राजकीय क्षेत्रातून या पुरस्कारासाठी निवड झाली ती बिहराचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची. विकासाची कास धरुन बिहारमध्ये पुन्हा सत्तेत आणण्याच्या कामगिरीसाठी त्यांची निवड झाली. तर कुमार मंगलम बिर्ला यांनी सर्वोत्कृष्ट उद्योजकाचा पुरस्कार पटकावला. दक्षिणेतील प्रसिध्द दिग्दर्शक शंकर याला मनोरंजन विभागातील पुरस्कारासाठी निवड झाली. लडाखमध्ये ढगफूटीनंतर लोकांसाठी घरे बांधण्यासाठी पुढाकार घेतलेल्या लडाख इकॉलॉजीकल आणि डेव्हलपमेंट ग्रूप आणि सिड्स या संस्थेला सामाजिक कार्य विभागातील पुरस्कार मिळाला. तर क्रीडा विभागातील सर्वोच्च पुरस्कार बॉक्सर सुशील कुमार याने पटकावला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 22, 2010 06:07 PM IST

जेपीसीबाबत विरोधकांची तयारी असेल तर विशेष सत्र बोलावू - प्रणव मुखर्जी

22 डिसेंबर

संसदेचे विशेष अधिवेशन घेण्याची तयारी सरकारनं दाखवली. जेपीसी चौकशीच्या मुद्द्यावर चर्चा करायची विरोधकांची तयारी असेल तर आम्ही विशेष सत्र बोलावू असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दिलं. तसेच नव्या नेतृत्वाला वाव देण्यासाठी आपल्याला निवृत्त व्हायचे आहे असंही त्यांंनी म्हटले. दिल्लीत सुरु असलेल्या सीएनएन आयबीएनच्या इंडीयन ऑफ द ईयर अवार्ड 2010 वितरण सोहळयात ते बोलत होते.

या विशेष सोहळ्यात क्रीडा,राजकारण, समाज सेवा क्षेत्र, उद्योग आणि मनोरंजन या विविध क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करणार्‍या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. यावर्षीचे राजकीय क्षेत्रातून या पुरस्कारासाठी निवड झाली ती बिहराचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची. विकासाची कास धरुन बिहारमध्ये पुन्हा सत्तेत आणण्याच्या कामगिरीसाठी त्यांची निवड झाली. तर कुमार मंगलम बिर्ला यांनी सर्वोत्कृष्ट उद्योजकाचा पुरस्कार पटकावला. दक्षिणेतील प्रसिध्द दिग्दर्शक शंकर याला मनोरंजन विभागातील पुरस्कारासाठी निवड झाली. लडाखमध्ये ढगफूटीनंतर लोकांसाठी घरे बांधण्यासाठी पुढाकार घेतलेल्या लडाख इकॉलॉजीकल आणि डेव्हलपमेंट ग्रूप आणि सिड्स या संस्थेला सामाजिक कार्य विभागातील पुरस्कार मिळाला. तर क्रीडा विभागातील सर्वोच्च पुरस्कार बॉक्सर सुशील कुमार याने पटकावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 22, 2010 06:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close