S M L

रायगडमध्ये एसटी अपघातात 23 ठार

1 नोव्हेंबर, रायगड रायगडमधल्या घोणसे घाटात दरीत कोसळून एसटी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 23 प्रवासी ठार झाले असून अपघतात 35 जण जखमी झाले आहेत. ही बस ठाण्याहून दिवे आगरला जात होती. रायगड-म्हसळा तालुक्यात ही घटना घडली. जखमींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे तर काहींना मुंबईतल्या सायन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. विशेष म्हणजे सरकारी मदत अजुनही या ठिकाणी पोहचलेली नाही. याठिकाणी वारंवारं अपघात होत असतात, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 1 लाख रुपये देणार असल्याचं रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 1, 2008 01:53 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2008 01:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close