S M L

मुंबई हायकोर्टाच्या अधिकार्‍यांनी केली आदर्शची पाहणी

23 डिसेंबरमुंबई हायकोर्टाने आदर्श प्रकरणी हायकोर्ट अधिकार्‍यांना आदर्श बिल्डींगला भेट द्यायला पाठवले होते. आदर्शमध्ये सध्या कोणी राहतंय किंवा नाही याची शहानिशा करण्यासाठी या अधिकार्‍यांना पाठवण्यात आले होते. सध्या हायकोर्टात आदर्शप्रकरणी सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यानच या अधिकार्‍यांना आदर्शकडे पाठवण्यात आलं. हे अधिकारी परतल्यावर काही वेळापूर्वीच म्हणजे तीन वाजता पुन्हा सुनावणी सुरु झाली आहे.अधिकार्‍यांनी पाहणी केल्यानंतर महानगरपालिकेने बंद केलेला पाणी आणि वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यास कोर्टाने नकार दिला आहे. या सोसायटीमध्ये पाणी किंवा वीज कनेक्शन नसल्याने कोणाला घर सोडावे लागले असं एकही उदाहरण समोर आलेले नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 23, 2010 01:38 PM IST

मुंबई हायकोर्टाच्या अधिकार्‍यांनी केली आदर्शची पाहणी

23 डिसेंबर

मुंबई हायकोर्टाने आदर्श प्रकरणी हायकोर्ट अधिकार्‍यांना आदर्श बिल्डींगला भेट द्यायला पाठवले होते. आदर्शमध्ये सध्या कोणी राहतंय किंवा नाही याची शहानिशा करण्यासाठी या अधिकार्‍यांना पाठवण्यात आले होते. सध्या हायकोर्टात आदर्शप्रकरणी सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यानच या अधिकार्‍यांना आदर्शकडे पाठवण्यात आलं. हे अधिकारी परतल्यावर काही वेळापूर्वीच म्हणजे तीन वाजता पुन्हा सुनावणी सुरु झाली आहे.अधिकार्‍यांनी पाहणी केल्यानंतर महानगरपालिकेने बंद केलेला पाणी आणि वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यास कोर्टाने नकार दिला आहे. या सोसायटीमध्ये पाणी किंवा वीज कनेक्शन नसल्याने कोणाला घर सोडावे लागले असं एकही उदाहरण समोर आलेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 23, 2010 01:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close