S M L

कांद्याचे भाव घसरले

24 डिसेंबरकांद्याची झालेली भाव वाढ केंद्रसरकार, सरकार यांनी युध्द पातळीवर केलेल्या उपाय योजनामुळे काही प्रमाणावर भाव वाढ कमी झाली आहे. राज्याच्या महत्वाच्या विभागात घाऊक बाजारात कांद्याचे भाव घसरले आहे.नाशिक-लासलगाव,मनमाड आणि नांदगाव बाजार समितीत कांद्याचे भाव क्विंटलला 2,500 रुपयांपर्यंत घसरले आहे. तर किमान भाव 300 रु क्विंटलपर्यंत घसरले. सरासरी भाव-1600 रु क्विंटल इतका झाला आहे.कांद्याच्या कमी भावामुळे शेतकरी संतप्तकांदा निर्यातबंदी झाली तशी कांद्याचे भाव घसरायला सुरुवात झाली. त्यामुळे आता शेतकरी चिडले आहेत.अहमदनगर इथल्या राहाता आणि राहुरीमधल्या शेतकर्‍यांनी कांदा लिलावच बंद पाडले आहेत. तसेच कमी भावाच्या निषेधार्थ शेतकरी रस्त्यावर उतरले असून त्यांनी नगर - मनमाड राज्य मार्ग रोखला. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 24, 2010 12:42 PM IST

कांद्याचे भाव घसरले

24 डिसेंबर

कांद्याची झालेली भाव वाढ केंद्रसरकार, सरकार यांनी युध्द पातळीवर केलेल्या उपाय योजनामुळे काही प्रमाणावर भाव वाढ कमी झाली आहे. राज्याच्या महत्वाच्या विभागात घाऊक बाजारात कांद्याचे भाव घसरले आहे.नाशिक-लासलगाव,मनमाड आणि नांदगाव बाजार समितीत कांद्याचे भाव क्विंटलला 2,500 रुपयांपर्यंत घसरले आहे. तर किमान भाव 300 रु क्विंटलपर्यंत घसरले. सरासरी भाव-1600 रु क्विंटल इतका झाला आहे.

कांद्याच्या कमी भावामुळे शेतकरी संतप्त

कांदा निर्यातबंदी झाली तशी कांद्याचे भाव घसरायला सुरुवात झाली. त्यामुळे आता शेतकरी चिडले आहेत.अहमदनगर इथल्या राहाता आणि राहुरीमधल्या शेतकर्‍यांनी कांदा लिलावच बंद पाडले आहेत. तसेच कमी भावाच्या निषेधार्थ शेतकरी रस्त्यावर उतरले असून त्यांनी नगर - मनमाड राज्य मार्ग रोखला. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 24, 2010 12:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close